Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या साखळी गावातील मेगा रॅलीला परवानगी नाकारली...

गोवा, गोवेकर स्वतंत्र नाहीत, मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा गळा घोटला : विजय सरदेसाई

Akshay Nirmale

Mahadayi Water Dispute: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी गावात म्हादई प्रश्नी विरोधकांनी 16 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या रॅलीला परवानगी रद्द केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या मुद्यावरून राज्य सरकारसह मुख्यमंत्र्यांवर टीका केली जाऊ लागली आहे.

रॅलीचा दिवस हा साखळीच्या आठवडी बाजाराचा दिवस आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी परवानगी रद्द करत असल्याचे साखळी पालिकेने म्हटले आहे. सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंटने या रॅलीचे आयोजन केले होते. दरम्यान, साखळीतील रॅलीची परवानगी रद्द करणे, हे मानवी समजुतीच्या पलीकडले आहे. यातून स्पष्ट होते की, गोवा हे राज्य स्वतंत्र नाही. गोवेकर स्वतंत्र नाहीत. ज्यांनी म्हादईचा गळा घोटला त्यांनीच लोकशाहीचाही गळा घोटला आहे आणि त्यात डॉ. प्रमोद सावंत यांचा हात आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

म्हादईच्या उपनद्यांचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकच्या नव्या डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिली. यानंतर गोव्यात जनक्षोभ उसळला आहे. सर्व स्तरातून या मुद्यावर सरकारला धारेवरून धरून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न गोव्यात होत आहे. कर्नाटकने संबंधित प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्तरावरची निविदा काढली. या सगळ्याचा विपरित परिणाम गोव्याच्या वन आणि पर्यावरणाबरोबर जनजीवन, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर होणार आहे. यामुळे राज्यात नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर पसरलेला आहे. त्यासाठीच म्‍हादईप्रश्‍‍नी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

राज्यात ठिकठिकाणी याबाबत जनजागृती सभा, छोट्या बैठका सुरू आहेत. रिव्होल्युशनली गोवन पक्षाच्या आंदोलनानंतर आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत ‘चलो साखळी’ची हाक दिली आहे. साखळी हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गाव आहे. 16 जानेवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गावात म्हादईसाठी आंदोलन करण्याचे ठरले आहे. पण आता साखळीतील मेगा पब्लिक रॅलीला परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. साखळी नगरपालिकेचे याबाबतचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT