स्टँडअप कॉमेडियन मुन्नवर फारुकीने कोकणी लोकांबाबत केलेले व्यक्तव्य त्याला चांगलंच भोवलं आहे. कोकणी लोकांचा अपमान केल्याबद्दल कोकणात तसेच गोव्यात पडसाद उमटले.
आमदार नितेश राणे यांनी तर मुनव्वरला थेट पाकिस्तानात पाठविण्याची भाषा केल्यानंतर मुनव्वरने माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोकणी लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे फारुकी म्हणाला.
मुनव्वरचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. मुनव्वर फारुकीला कोकणी लोकांची टिंगल उडविण्याची एवढी हौस असेल तर, आम्हाला त्याच्या घरचा पत्ता माहिती आहे. त्याला मालवणी हिसका दाखवावा लागेल, त्यानंतर तो पुढचे स्टँडअप मालवणीतून करेल. कोकणी लोकांचा अपमान करायची हिंमत करशील तर, तुझ्या सारख्या हिरव्या सापाला पाकिस्तानात पाठविण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा आमदार राणे यांनी मुनव्वरला व्हिडिओ द्वारे दिला.
आमदार राणे यांनी मुनव्वरला टॅग करुन दिलेल्या इशाऱ्यानंतर मुनव्वरने माफी मागितली. तलोजामध्ये माझे अनेक कोकणी मित्र आहेत. शो दरम्यान केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.
कोकणी लोकांना दुखवण्याचा किंवा त्यांचा अवमान करण्याचा माझा अजिबात प्रयत्न नव्हता. तरी देखील या वक्तव्यामुळे कोणाचा भावना दुखावल्या असतील मी मनापासून माफी मागतो. तसेच, मी ज्यावेळी बोललो त्याचा सर्वानीच आनंद घेतल्याचे त्यांने व्हिडिओत सांगितले. पण, कोणाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो, असे मुनव्वर म्हणाला.
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने एका शोदरम्यान पनवेलमधील तलोजाचा उल्लेख करत कोकणी माणसाचा संदर्भ दिला होता. यावेळी त्याने कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरला. त्याचा हा व्हिडिओ वादाच्या भोवऱ्यात सापडला. कोकणासह गोव्यात याबाबक पडसाद उमटल्यानंतर मुनव्वरने माफी मागितली आहे.
गोव्यातील भाजप प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स यांनी देखील मुनव्वरच्या वक्तव्याचा निषेध केला. कोकणातील लोक प्रेमळ आहेत. बाहेरच्या लोकांनी येथे येऊन वातावरण दुषित केले आहे. विशेषत: माझ्या गोव्यात, असे सावियो यांनी सोशल मिडिया एक्सवर लिहले आहे.
मुनव्वरने कोकणी लोकांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुनव्वरच्या माफीची मागणी जोर धरु लागली. मुनव्वरच्या व्हिडिओवर राजकीय नेत्यांनी देखील आक्षेप घेतल्यानंतर अखेर त्याने माफी मागितली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.