गोवा ते हैदराबाद फ्लाइटच्या ओव्हर विंग एक्झिटमध्ये छेडछाड; आंध्रच्या प्रवाशाविरोधात गुन्हा

Dabolim Airport: इंडिगो एअरलाइन्सच्या गोवा ते हैदराबाद फ्लाइटमध्ये प्रवाशाने ओव्हर विंग एक्झिटमध्ये छेडछाड केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
गोवा ते हैदराबाद फ्लाइटच्या ओव्हर विंग एक्झिटमध्ये छेडछाड; आंध्रच्या प्रवाशाविरोधात गुन्हा
over wing exit
Published on
Updated on

दाबोळी: गोवा ते हैदराबाद फ्लाइटमध्ये प्रवाशाने ओव्हर विंग एक्झिटमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाइन्सच्या गोवा ते हैदराबाद फ्लाइटमधील एका प्रवाशाने विमानाच्या ओव्हर विंग एक्झिट पीएलए कार्डमध्ये छेडछाड करून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. दाबोळी पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत येंदुरी पवन कल्याण (रा. आंध्र प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

प्रवाशाने ओव्हर विंग एक्झिटसोबत छेडछाड केल्यानंतर एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी दाबोळी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी प्रवाशाविरोधात कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nepalese Man Acquitted In POCSO Case
Goa Crime And Social Concerns
Goa Uncle Murder Case
Illegal Petroleum Storage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com