Vasai Virar Theft Case  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील रोहित शेट्टीला मुंबई पोलिसांकडून अटक, एका मिनिटांत कुलूप तोडून करायचा घर साफ

रोहितने 3 एप्रिल 2023 रोजी वसईतील फ्लॅट फोडून सुमारे 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.

Pramod Yadav

एका मिनिटापेक्षा कमी वेळात फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या गोव्यातील संशयित आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अरहान चेतन शेट्टी उर्फ रोहित (21) याला पोलिसांनी गोव्यातील म्हापसा शहरातील एका हॉटेलमधून अटक केलीय. अरहान हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता.

रोहितने 3 एप्रिल 2023 रोजी वसईतील फ्लॅट फोडून सुमारे 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.

या प्रकरणाचा तपास करत असताना, पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी आणि विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले.

तपासाअंती चोरट्यांचा सुरतमधील अशाच प्रकारच्या एका घटनेत सहभाग असल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान, ऑक्टोबर 2022 मध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. रोहित वारंवार लोकेशन आणि मोबाईल नंबर बदलत असल्याने त्याचा पत्ता मिळत नव्हता.

तुरुंगाच्या रजिस्ट्रीमधून पोलिसांना काही महत्त्वपूर्ण लीड्स मिळाल्या आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्सच्या मदतीने गोव्यातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असलेल्या रोहितला अटक करण्यात आली. अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

अशी होती रोहितच्या चोरीची मोडस ऑपरेन्डी

रोहितची चौकशी केली असता, त्याने वसई, विरार, मुंबई आणि ठाणे येथील विविध भागात 27 चोर्‍या केल्याची कबुली दिली. 2014 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पहिली चोरी केली होती. चोरी केल्यानंतर तो पळून जायचा आणि पोलिसांना चकमा देण्यासाठी इतर राज्यातील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा.

आरोपींच्या ताब्यातून मोबाईल फोन, रोख रक्कम, सोने आणि चांदीचे दागिने यासह 8.35 लाख किमतीची चोरीची लूट जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर आयपीसीच्या कलम 454, 457 आणि 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT