Mumbai-Goa Vande Bharat Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस चाचणी यशस्वी; सेवेला लवकरच प्रारंभ शक्य

विनाथांबा सात तासांत कापले अंतर

दैनिक गोमन्तक

Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा आणि गोवा-मुंबई रेल्वे प्रवास सुखदायी, आरामदायी व केवळ कमी वेळांत पूर्ण व्हावा, यासाठी रेल्वेकडून मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने काल या एक्स्‍प्रेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

मुंबईहून सकाळी ५.५० वाजता सुटलेली ट्रेन मडगाव रेल्वे स्थानकावर दुपारी बरोबर १२.५० मिनिटांनी पोहोचली. या एक्स्प्रेसने हे अंतर केवळ ७ तासांत पूर्ण केल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

‘काल केवळ चाचणी घेण्यात आली. ती केव्हापासून नियमित सुरू होईल, हे निश्‍चित नाही. ही रेल्वे भारतीय बनावटीची असून मेक इन इंडिया योजनेंतर्गत विकसीत केली आहे. काल रेल्वेने कुठल्याही रेल्वे स्थानकावर थांबा घेतला नाही, असे घाटगे म्हणाले.

अशी आहेत वैशिष्ट्ये

  • वंदे भारत ट्रेनचा वेग हा ताशी १८० ते २०० किलोमीटर इतका असतो व संपूर्ण डबे एअर कंडिशनर अर्थात वातानुकूलित असतात.

  • जीपीएसच्या आधारित ऑडिओ विज्युअल माहिती प्रणाली यामध्ये असते. तसेच खिडक्या, दरवाजे हे स्वयंचलित असतात.

  • यामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व प्रत्येक डब्यात इमर्जन्सी बटन असते. व्हॅक्युम आधारित टॉयलेटचा समावेश असतो. सीट हे १८० डिग्रीमध्ये फिरणारे असतात.

मोदी दाखवणार हिरवा झेंडा!

चाचणी यशस्वी झाल्याने ही एक्स्प्रेस लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे.

वेळ वाचणार

रेल्वे गाड्यांना मुंबई-गोवा किंवा गोवा-मुंबई अंतर कापण्यासाठी १० ते १२ तास लागतात. ही गाडी काही ठराविक रेल्वे स्थानकांवर थांबेल.

त्यामुळे जास्तीत जास्त ८ तासांत ही एक्स्प्रेस अंतर कापेल. जेणेकरून प्रवाशांचे चार तास वाचतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

Viral Video: आधी ट्रेनची काच लखलखीत, मग रुळावर 'ती' कृती... तरूणीचा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी गोंधळात

Dindi Utsav : 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

कुठ्ठाळीत स्थलांतरीतांना हवाय कन्नड आमदार?? कन्नड महासंघाची मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT