Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग हाऊसफुल! 31 डिसेंबरसाठी पर्यटक पडले बाहेर; गोवा-कोकणाकडे वळली पावले

Mumbai Goa Highway Update : मुंबई, पुणे, बेंगळुरू, दिल्लीसह देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांमुळे कोकण, गोव्यातील पर्यटन स्थळे गजबजून गेली असून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.

Sameer Panditrao

Goa New Year Crowd : नाताळ झाल्या झाल्या नववर्षाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू, दिल्लीसह देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांमुळे कोकण, गोव्यातील पर्यटन स्थळे गजबजून गेली असून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.

गोव्यातील समुद्रकिनारे, मंदिरे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. नुकताच नाताळ साजरा झाल्याने त्यानिमित्याने होणाऱ्या कार्यक्रमांचा आस्वादही पर्यटक घेत आहेत. पणजी, मापसा, मडगाव आणि वास्को परिसरातही पर्यटकांची गर्दी स्पष्टपणे दिसून येत आहे.

मुंबई–गोवा महामार्गावर सतत वाहनांची गर्दी दिसत आहेत. संगमेश्वर बाजारपेठ परिसरात वाहने अडकून पडत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याकडेही पर्यटक प्राधान्य देत आहेत.२७ डिसेंबर शनिवार असल्याने आणि वर्षसमाप्तीला त्यानंतर तीनच दिवस राहत असल्याने यानिमित्याने मोठी सुटी घेऊन पर्यटक बाहेर पडले आहेत.

रत्नागिरी, कर्दे, गुहागर, मुरुड या रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी गर्दी होत आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनाला दुरून लोक येत आहेत. याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही गर्दीने भरली आहेत. वाढत्या गर्दीमुळे व्यवसायिक मात्र खुश आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT