Mumbai Goa Highway | Ganesh Chaturthi 2023 
गोवा

Mumbai Goa Highway: खरचं मुबई - गोवा महामार्गाची सिंगल लेन सुरु झाली का? कोकणात येणारे प्रवासी काय म्हणताहेत?

खोटारडे मंत्री राजीनामा देतील का? मनसेचा मंत्री चव्हाण यांना प्रश्न

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई- गोवा महामार्गाची सिंगल लेन सुरू केली जाईल असे ठोस आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मंगळवारी सर्वत्र लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे.

गणपती आगमन काही तासांवर येऊन ठेपले असताना खरचं महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे का? सध्या कोकणात येणारे प्रवासी याबाबत काय बोलत आहेत, हे या वृत्तातून जाणून घेऊया.

गणेशोत्सवासाठी रोजगारानिमित्त विविध ठिकाणी असलेले चाकरमानी कोकणात दाखल व्हायला लागले आहेत. मागील दोन दिवसांपासून मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे वृत्त समोर येत आहेत. तर, महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी महामार्गाची अवस्था आणि सिंगल लेनाच्या कामाबाबत संताप व्यक्त करत आहेत.

रवींद्र चव्हाण हे छायाचित्र निरखुन पहा. बोलले त्याप्रमाणे खरच जर सिंगल लेन पुर्ण झाली किंवा "मोटरेबल" झाली असेल तर सर्व वाहने उजव्या बाजुच्या लेनवर का आहेत.? मुंबई‌कडून गोव्याकडे जाणारी लेन तर डावीकडे आहे. अजून किती पुरावे हवेत रविंद्र चव्हाणांच्या खोटारडेपणाचे ?

"मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीने श्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या खोट्या दाव्यांची पोल खोल केली.आतातरी खोटारडे मंत्री राजीनामा देतील का ??" असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन सुरु होईल असे आश्वासन दिले होते पण, ते खोटे ठरले आहे. खुला करण्यात आलेला कशेडी घाट बोगद्याचे काम अद्याप सुरु आहे. असे ठाण्यातून कोकणात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने म्हटले आहे. घरी पोहचण्यासाठी पंधरा तास वेळ लागला असेही या प्रवाशाने सांगितले.

दरम्यान, महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असून, महामार्गाची अवस्था देखील बिकट असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. सिंगल लेनचे आश्वसान पूर्ण न केल्याने मंत्री चव्हाण राजीनामा देतील असा प्रश्न मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; मोदी रिबेलोंना भेट देणार?

Goa Assembly Election 2027: विधानसभेसाठी ‘आप’ची युतीकरिता तयारी! वाल्मिकी नाईक यांनी स्पष्ट केली भूमिका Watch Video

Birch Club Fire: ‘बर्च’ अग्नितांडवाचा तपास संथगतीने! मायकल लोबोंचे प्रतिपादन; संबंधितांवर त्वरित कारवाईची मागणी Video

ST Reservation: निद्रिस्त सरकारला जाग आणणार! मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन; ‘एसटी’ राजकीय आरक्षणासाठी आझाद मैदानावर धरणे

Goa Crime: कार आडवी घातली, आरसा तोडला! म्हापशात कारचालकाचा गोंधळ; रोडरेज प्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT