ST Reservation: निद्रिस्त सरकारला जाग आणणार! मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन; ‘एसटी’ राजकीय आरक्षणासाठी आझाद मैदानावर धरणे

ST political reservation Goa: निमंत्रक जॉन फर्नांडिस यांनी या संबंधीचे विधेयक संसदेत ऑगस्ट २०२४ मध्ये संमत करण्यात आले होते. मात्र त्याला राष्ट्रपतींनी एका वर्षाने म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये मान्यता दिली.
Goa ST Reservation
Goa ST ReservationDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात ‘एसटी’ला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी संसदेने केलेल्या कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळून सहा महिने उलटत आले तरी हे आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने जी प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होती ती करण्यात हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप करून निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी १४ जानेवारी रोजी पणजी येथील आझाद मैदानावर धरणे धरणार असल्याचे मडगाव येथे जाहीर केले.

या संबंधी विचार विनिमय करण्यासाठी मडगाव येथे मिशनच्या पदाधिकाऱ्यांची निमंत्रक जॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गोविंद शिरोडकर, कांता गावडे, जोसेफ वाझ, रवींद्र वेळीप तसेच अन्य महत्वाचे नेते उपस्थित होते.

Goa ST Reservation
Goa Tribal Reservation: आता दिल्लीकडे साऱ्यांचे लक्ष, ST राजकीय आरक्षणाचा मुद्दा; प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा

त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक जॉन फर्नांडिस यांनी या संबंधीचे विधेयक संसदेत ऑगस्ट २०२४ मध्ये संमत करण्यात आले होते. मात्र त्याला राष्ट्रपतींनी एका वर्षाने म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर यासाठी अधिकारिणी नेमून पुढील प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते. मात्र, या संबंधी सरकार काहीच करत नाही. त्यामुळे हे सरकार ‘एसटी’ना गृहीत धरत आहे असे वाटते.

Goa ST Reservation
Goa ST Reservation: गोव्‍यात ‘एसटीं’च्या राजकीय आरक्षणासाठी 2032 ची प्रतीक्षा? तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केली शक्‍यता

सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन!

या सरकारला इशारा देण्यासाठी आणि झोपेतून जागे करण्यासाठी बुधवारी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जॉन फर्नांडिस यांनी सांगितले.यावेळी गोविंद शिरोडकर यांनी बुधवारचे हे आंदोलन आमची अस्मिता आणि अधिकार राखून ठेवण्यासाठी असून त्यामुळे ज्या कुणाला या ‘मिशन’मधून आपला राजकीय फायदा होणार, असे वाटते त्या लोक प्रतिनिधींनी पक्षाच्या कक्षा ओलांडून या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com