Goa Police: सावधान! तोतया पोलीस फोन करुन उकळताहेत पैसे, खऱ्या पोलिसांचे गोवेकरांना आवाहन

गोवा पोलिसांनी नागरिकांना अशा बनावट फोन कॉल आणि तोतया पोलिसांपासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.
Cyber Crime
Cyber CrimeDainik Gomantak

Goa Police: 'मी पोलीस अधिकारी बोलतोय, तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.' अशा प्रकारे फोन करुन नागरिकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. गोव्यात मागील काही दिवसांत अशा घटना समोर आल्या आहेत.

गोवा पोलिसांनी नागरिकांना अशा बनावट फोन कॉल आणि तोतया पोलिसांपासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे विविध पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो सोशल मिडियावरुन डाऊनलोड करुन त्याचा वापर करतात. स्वत:च्या व्हॉट्सअपवरती डिपी म्हणून वापर करत, समोरच्याला फसविले जाते.

अनेकवेळा ठराविक व्यक्तीला फोन करुन त्यांच्या नावाने कुरिअर आल्याचे सांगितले जाते. पण, कुरिअर संशयास्पद असल्याने ते खोलण्यात आले आणि त्या संदिग्ध वस्तू आढळून आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी तुमच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

तोतया पोलीस संबधित व्यक्तीवर दबाव टाकून पैसे जमा करण्यास सांगतात. एकदा पैसे जमा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत तोतया पैसे काढून घेतात. असे पोलिसांनी सांगितले.

2021 पासून ऑगस्ट 22 पर्यंत गोव्यात सायबर क्राईम संबधित 179 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये बनावट ओळखीचा आधार घेत फसवणूक केल्याचे प्रकार अधिक आहेत.

याशिवाय सोशल मिडिया प्रोफाईलचा वापर करुन फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. यातून आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत.

यामुळे नागरिकांना सोशल मिडियावर स्वत:ची माहिती शेअर करण्यास टाळण्याचे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com