Mumbai Goa highway  Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: .. त्या ठेकेदारांवर अद्याप कारवाई नाहीच

ज्येष्ठ नागरिकांची गडकरींकडे तक्रार

दैनिक गोमन्तक

Mumbai Goa Highway : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले असून, गोव्यातील (Goa) संबंधीत अधिकार्‍यांनी महामार्गाच्या (Highway) कामाच्या कंत्राटदारावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याची आठवण करून दिली.

नितीन गडकरींनी पीडब्ल्यूडीला (PWD) चौकशी करण्याचे निर्देश देऊन झाल्यावर सुमारे तीन महिने उलटले आहेत. परंतु अजूनही याची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa highway) कामाबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने कंत्राटदाराला बरखास्त करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीदरम्यान घेतला आहे. एमईपी कंत्राटदाराला बरखास्त करुन त्याच्या जागी दोन कंत्राटदारांना नियुक्त करण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते लांजापर्यंतचे92 किमी असलेल्या एमईपी कंत्राटदाराला बरखास्त करुन दोन नवे कंत्राटदार नेमण्याचे देखील आदेश यावेळी गडकरी यांनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT