Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: काजळी नदीला पूर! मुंबई-गोवा महामार्ग बंद; पर्यायी मार्ग कोणता?

रत्नागिरीत गुरूवारी मुसळधार पाऊस झाला, यामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला आहे.

Pramod Yadav

रत्नागिरीतील काजळी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीवर पूल फार जुना असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरीत गुरूवारी मुसळधार पाऊस झाला, यामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला असून, नदी भरभरुन वाहतेय.

काजळी नदी लांजा तालुक्यातून वाहत जाणारी ही नदी रत्नागिरीतून पुढे अरबी समुद्राला मिळते. गुरूवारी दुपारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पूल वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अंजनारी पूलाच्या येथे थांबवण्यात आली आहे. दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहनांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

कोणता पर्यायी मार्ग वापरता येईल?

मुंबई - गोवा महामार्ग बंद करण्यात आल्याने रत्नागिरीला जाणारी वाहतूक ही पावस मार्गे वळवण्यात आली आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पावस मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा हा मार्ग खुला केला जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT