Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर अपघातांची शृकंला काहीकेल्या थांबण्याचे नाव घेत नाही. रखडलेल्या महामार्गाचे काम देखील कधी पूर्ण होणार याबाबत स्पष्टता नाही. मात्र, मार्गावर होणारे अपघात दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शनिवारी (दि.24) मुंबई - गोवा महामार्गावर पळस्पे येथे भीषण अपघात झाला असून, यात जिल्हा परिषदेवर शिक्षिका असलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ललिता ओंबळे असे या महिला शिक्षिकेचे नाव असून, त्या पनवेल - गिरवले येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका होत्या. शनिवारी सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या, दरम्यान पळस्पे गावच्या हद्दीत एका दुचाकी चालकाने ललिता यांना कट मारला अन् त्यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर कोसळल्या.
एवढ्यात एकेरी मार्गावरून येणारा एक भरधाव कंटेनर त्यांच्या अंगावरून गेला. कंटेनरचे चाक ललिता यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. रक्कबंबाळ झालेल्या ललिता यांचा जागीच मृत्यू झाला.
एकेरी वाहतुकीमुळे अरुंद रस्ता आणि पावसामुळे निसरडा झालेला मार्ग यामुळे अपघातांच्या घटना वारंवार घडत आसल्याचे स्थानिक सांगतात. अपघात एवढा भीषण होता की यावेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या अंगावर देखील काटा आला. अपघातात ललिता पूर्णपणे रक्तबंबाळ झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातामुळे मुंबई - गोवा महामार्गावर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, स्थानिक कार्येकर्त्यांनी वाहतूक सुरळीत केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.