Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पो आणि ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू

कोल्हापूरकडून हातखंबाकडे येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पो आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (18 ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा हा अपघात झाला.

कोल्हापूरकडून हातखंबाकडे येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

राजेंद्र बाबल्या डांगे (वय 40, रा. हातखंबा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या स्थानिकाचे नाव आहे. तसेच, दोन जण या अपघातात जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरकडून हातखंबाकडे येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने आयशर टेम्पोसोबत अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावर बऱ्याचकाळ वाहतूक खोळंबली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलीस खोळंबलेले ट्रॅफिक रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते.

घराच्या बांधकामासाठी राजेंद्र डांगे कोल्हापूरमधून लाद्या आणण्यासाठी गेले होते. कोल्हापूरकडून माघारी येताना हातखंबा येथे टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात अंगावर राजेंद्र यांच्या दगडी लाद्या पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

राजेंद्र डांगे यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली एक मुलगा असा परिवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT