Railway, Tunnel  Canva
गोवा

Kokan Railway: लोहमार्ग दुरुस्ती कामामुळे अनेक गाड्या रद्द! कोकण रेल्वेच्‍या सेवेवर परिणाम

Goa Train: काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उत्तर व दक्षिण भारतात लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गोव्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

वास्को ते निजामुद्दीन एक्सप्रेस ४ ते २५ सप्टेंबरदरम्यान आग्रा कांट, गझियाबाद आणि नवी दिल्लीमार्गे वळवण्यात आली आहे. २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान निजामुद्दीन ते वास्को एक्सप्रेस बालाबाग येथे अर्धा तास थांबवून ठेवण्यात येणार आहे.

शिवाय चंदीगड मडगाव एक्सप्रेस ७, ९, १४ आणि १६ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. मडगाव-चंदीगड एक्सप्रेस १०, ११, १७ व १८ सप्टेंबर रोजी धावणार नाही. मडगाव एर्नाकुलम एक्सप्रेस ८ व १५ सप्टेंबर रोजी तर एर्नाकुलम मडगाव एक्सप्रेस ९ व १६ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

चंदीगड कोचुवेली एक्सप्रेस ६, ११ व १३ सप्टेंबर रोजी आदर्शनगर, दिल्ली कांट, रेवारी, अलवार, मथुरामार्गे वळवण्यात आली आहे. याच मार्गाने कोचुवेली चंदीगड एक्सप्रेस ७, ९ व १४ सप्टेंबर रोजी धावेल. कोचुवेली-अमृतसर आणि अमृतसर-कोचुवेली एक्सप्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीन व निजामुद्दीन-एर्नाकुलम या गाड्याही या मार्गावरून धावणार आहेत.

मडगावहून १६ सप्टेंबर रोजी सुटणारी राजधानी एक्सप्रेस ४ तास ४० मिनिटे उशिराने म्हणजे दुपारी १२.४० वाजता सुटणार आहे. १० सप्टेंबरची एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस उत्तर मध्य रेल्वेच्या विभागात अर्धा तास थांबवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT