Bicholim Mining Dainik Gomantak
गोवा

Mulgao: वेळप्रसंगी विधानसभेवर मोर्चा नेऊ! मुळगाववासी आक्रमक; 'खाणीला विरोध नाही, मात्र गाव सांभाळा' भूमिकेवर ठाम

Mulgao mining issue: पणजी येथे उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे मुळगाववासीयांनी एक बैठक आयोजित केली होती.

Sameer Panditrao

डिचोली: खाणप्रश्नी मुळगाववासीय आपल्या भूमिकेशी ठाम आहेत. खाण लीज क्षेत्रप्रकरणी सरकारकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप आज (शनिवारी) झालेल्या बैठकीत मुळगावच्या लोकांनी केला. गावच्या अस्तित्वासाठी वेळप्रसंगी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा निर्णयहीआजच्या मुळगाव येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मुळगाव कोमुनिदादचे अध्यक्ष महेश्वर परब यांनी हा ठराव घेताच उपस्थितांनी त्याला पाठिंबा दिला. खाणीला आमचा विरोध नाही. मात्र, गाव सांभाळा, अशी मुळगाववासीयांची भूमिका आहे. गेल्या मंगळवारी (ता.१८) पणजी येथे उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे आज मुळगाववासीयांनी एक बैठक आयोजित केली होती.

मुळगावच्या श्री केळबाय मंदिरात झालेल्या या बैठकीस सरपंच मानसी कवठणकर यांच्यासह पंचसदस्य तसेच देवस्थान, कोमुनिदाद, शेतकरी आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खाण लीजप्रश्नी लक्ष घालण्याची ग्वाही देऊनसुद्धा खासदार श्रीपाद नाईक यांनी आता मौन बाळगले आहे, अशी टीका माजी सरपंच वसंत गाड यांनी केली.

अन्यथा ‘बफर झोन’प्रमाणे खाण सुरू करा!

घरे-दारे, मंदिरे आदी नैसर्गिक संपत्ती खाण लीज क्षेत्रातून बाहेर काढा, ही मुळगाववासीयांची मुख्य मागणी आहे. एक तर खाण लीज क्षेत्रातून गाव बाहेर काढा, नाही तर २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसार ‘बफर झोन’प्रमाणे खाण सुरू करा, अशी भूमिका आजच्या बैठकीत मांडण्यात आली.

फेन्सिंग प्रस्तावाला हरकत

दुसऱ्या बाजूने घरांपासून ५० मीटर अंतरावर फेन्सिंग करण्याच्या कंपनीच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा करण्यात आली. या प्रस्तावाला अनेकांनी हरकत घेतली. सरपंच मानसी कवठणकर, जैवविविधता समितीचे स्वप्नेश शेर्लेकर, शेतकरी संघटनेचे प्रकाश परब आदींनी या बैठकीत मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Xi Jinping: जिनपिंग यांचे 'अध्यक्षपद' जाणार? विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वबदलाची चीनमध्ये रंगली चर्चा

Usgao: विनापरवाना बांधली भिंत, उसगावात वाढला पुराचा धोका; पंचायतीने बजावली नोटीस

Goa Live News Updates: त्या दोन मुली महाराष्ट्र-नाशिक येथे सापडल्या

Dattwadi Temple: 'प्रशासन चुकले, मामलेदारांविरोधात तक्रार करणार'! साखळीतील मूर्ती चोरी प्रकरणाला वेगळे वळण

Love Horoscope Today: रवि योग आणि नीचभंग राजयोगाचा 'या' राशींच्या लव्ह लाईफवर होणार परिणाम!

SCROLL FOR NEXT