Police  Dainik Gomantak
गोवा

Goa News: शिरोडकर कुलस्वामिनी घुमटीतील फंडपेटी फोडली; कर्नाटकातील संशयित चोरट्यास अटक

Goa Theft Case : याप्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण घोडगे यांनी शनिवारी डिचोली पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भादंसंच्या ४५४, ४५७ आणि ३८० कलमान्वये गुन्हा नोंद करून चौकशी सुरु केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

मुळगाव येथील मंदिरातील फंडपेटी फोडल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयित चोरट्यास मुद्देमालासह अटक केली आहे.

मुळगाव येथील श्री देव रवळनाथ महालक्ष्मी देवस्थानशी संलग्न असलेल्या शिरोडकर कुलस्वामिनी घुमटीतील फंडपेटी तोडून ती मंदिरापासून काही अंतरावर फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करण्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण घोडगे यांनी शनिवारी डिचोली पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भादंसंच्या ४५४, ४५७ आणि ३८० कलमान्वये गुन्हा नोंद करून चौकशी सुरु केली.

या चोरी प्रकरणात मूळ कर्नाटक येथील आणि सध्या मुळगाव येथे राहणाऱ्या गुरेसाब बाबूसाब कलीमणी (वय-३५) या संशयित युवकाला पोलिसांनी अटक करून फंडपेटीतून चोरलेली रोख रक्कम तसेच फोडलेली फंडपेटी हस्तगत केली आहे.

याप्रकरणी डिचोलीच्या पोलिस उपअधीक्षकाचा ताबा असलेले जिवबा दळवी आणि पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तपासाला गती देऊन संशयित चोरट्यास अटक केली.

पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. या पथकात विशाल परब, प्रांजल वेलिंगकर आणि मयूर असुलकर या पोलिस कॉन्स्टेबलांचा समावेश होता. याप्रकरणी डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माझी पत्नीही ओरडायला लागली..."; वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर, दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला...

Smartphones Under 20000: 20 हजारांच्या आत धांसू 5G फोन! मोठी बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि जबरदस्त कॅमेरा; पाहा 5 बेस्ट पर्याय

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

SCROLL FOR NEXT