Mulgao Mining Resident Protest Dainik Gomantak
गोवा

Mulgao: 'आमका नाका खाण'! मुळगाववासीय आक्रमक; खाणीवर धडक देऊन कामकाज पाडले बंद

Mulgao Mining Issue: खाणप्रश्नावरून संतप्त झालेल्या मुळगावातील 300 हून अधिक लोकांनी रविवारी सायंकाळी खाणीवर धडक दिली आणि खाण बंद करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

Sameer Panditrao

Mulgao Mining Resident Protest

डिचोली: खाणप्रश्नावरून संतप्त झालेल्या मुळगावातील 300 हून अधिक लोकांनी रविवारी सायंकाळी खाणीवर धडक दिली आणि खाण बंद करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यात महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

खाण लीज क्षेत्रातून मुळगाव हा गाव वगळा, गावचे निसर्गवैभव जपा, ही ग्रामस्‍थांची मागणी आहे. आधी गावचे प्रश्न सोडवा आणि नंतरच खाणीचा विचार करा असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आणि खाणीचे कामकाज बंद पाडले.

मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून झालेला आहे आणि याबाबत हवी तशी दखल घेण्यास आलेली नाही असे स्थानिकांचे मत आहे. खाण परिसरात झालेली वृक्षतोड तसेच खाणीच्या कामामुळे गावाचे अस्तित्व कसे धोक्यात येत आहे हे प्रशासनाला लक्षात येत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आम्ही गावात राहतो, शहरात नाही

आम्ही गावात रहातो शहरात नाही त्यामुळे खनिज वाहतूक, धूळ, रात्रीअपरात्री येणारे मशिन्सचे धडधड करणारे आवाज याची आम्हाला सवय नाही अशी प्रतिक्रिया मुळगावातील एका रहिवाशाने दिली. या सगळ्या गोष्टींमुळे गावचे स्वास्थ्य आणि शांतता भंग होत आहे असेही मत त्यांनी नोंदवले.

जाहीर सभा

खनिज प्रश्‍‍नावरून मुळगाववासीयांनी दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी खाणविरोधी जाहीर सभेचे आयोजन गावकरवाडा येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात केले होते. लीज क्षेत्रातून मंदिरांसह घरेदारे, शेती-बागायती, नैसर्गिक जलस्रोत वगळून गावातील अन्य प्रश्‍‍न सोडविण्याकडे दुर्लक्ष झाल्यास खाणीवर धडक देऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

‘वेदान्‍ता’ ला निवेदन

दीड महिन्यापूर्वी मुळगाव पंचायतीतर्फे ‘वेदान्‍ता’ कंपनीला निवेदन देण्यात आले असून, त्‍यात पंधरा मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. या निवेदनाच्‍या प्रती आमदारांसह संबंधित सरकारी यंत्रणांना दिली आहे. मुळगाववासीयांनी केलेल्या मागण्यासंदर्भात ‘वेदान्‍ता’ खाण कंपनी गंभीर आहे. सध्‍या या मागण्या विचाराधीन आहेत अशी ग्वाही कंपनीचे मुख्य उपकार्यकारी अधिकारी धीरजकुमार जगदीश यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT