Mud at an alternative bus station in Bicholim due to rain Dainik Gomantak
गोवा

डिचोलीतील पर्यायी बसस्थानकावर चिखल

उपाययोजना करा : पाणी तुंबल्याने प्रवाशांना नाहक त्रास

दैनिक गोमन्तक

डिचोली : पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने डिचोलीतील पर्यायी बसस्थानकावर पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. जोरदार पावसावेळी बसस्थानकावर पाणी तुंबत असल्याने बसवाले तसेच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, गेल्या आठवडाभरात पडलेल्या पावसामुळे या बसस्थानकावर पाणी तुंबले असून, पाऊस थांबला, की बसस्थानकावर चिखलमय दलदल निर्माण होत आहे.

(Mud at an alternative bus station in Bicholim due to rain)

पाणी अन् चिखल

बसस्थानकाच्या मागे आणि समोरील भागात पाणी तुंबून राहते. प्रवासी बसगाड्या आत आणि बाहेर घेतात, त्याठिकाणी तर पाणी तुंबून राहते. त्याठिकाणी दलदलही निर्माण होत आहे. बसगाड्या आत-बाहेर घेताना चिखलमय पाणी प्रवासी आणि रस्त्यावरील दुचाकीस्वारांच्या अंगावर उसळत असते.

त्यामुळे त्यांना उपद्रव सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे.

पाण्याचा निचरा करा

या बसस्थानकावर पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली नाही, तर संपूर्ण पावसाळ्यात गंभीर समस्या निर्माण होणार आहे. बसस्थानकावर पाय ठेवणेही अशक्य होणार आहे, असे बसवाले आणि प्रवाशांची मत आहे. सरकारने या बसस्थानकावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी विनाविलंब आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT