MP Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Goa Shirdi-Tirupati Flight: गोमंतकीयांना आता शिर्डी आणि तिरुपतीला जाणे सोपे होणार आहे. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केंद्र सरकारकडे एक खास मागणी केली.

Manish Jadhav

पणजी: गोमंतकीयांना आता शिर्डी आणि तिरुपतीला जाणे सोपे होणार आहे. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केंद्र सरकारकडे एक खास मागणी केली. त्यांनी 'उडान' ((Ude Desh Ka Aam Naagrik) योजनेतर्गंत गोव्याहून शिर्डी आणि तिरुपतीसाठी रोज थेट विमानसेवा सुरु करावी, अशी विनंती केली. या मागणीमुळे गोमंतकीय भाविकांना मोठा दिलासा मिळेल आणि धार्मिक पर्यटनही वाढेल, असे त्यांनी सांगितले.

भाविकांच्या समस्यांचा उल्लेख

खासदार तानावडे यांनी स्पष्ट केले की, शिर्डी (Shirdi) आणि तिरुपती ही दोन्ही तीर्थक्षेत्रे गोव्यातील भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेची आणि महत्त्वाची आहेत. मात्र, थेट विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्या गोव्याहून या ठिकाणी जाण्यासाठी थेट विमानसेवा नाही. त्यामुळे भाविकांना लांबचा प्रवास करावा लागतो.

कनेक्टिंग फ्लाईट्सचा पर्याय निवडल्यास प्रवाशांना दुसऱ्या शहरात थांबा घ्यावा लागतो. यामुळे प्रवासात मोठा विलंब होतो आणि संपूर्ण प्रवासाचा कालावधी वाढतो. थेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे कनेक्टिंग फ्लाईट्सचे प्रवासाचे तिकीट दर वाढतात. परिणामी, गोव्यातील भाविकांसाठी शिर्डी आणि तिरुपतीची यात्रा अधिक खर्चिक ठरते. तानवडे यांनी नमूद केले की, अनेक वृद्ध भाविक आणि कुटुंबे या लांब आणि त्रासदायक प्रवासाला कंटाळतात, ज्यामुळे त्यांची तीर्थयात्रा करण्याची इच्छा असूनही ते जाऊ शकत नाहीत.

'उडान' योजनेअंतर्गत मागणी

खासदार तानावडे यांनी केंद्र सरकारकडे 'उडान' योजनेअंतर्गत ही थेट विमानसेवा सुरु करण्याची विनंती केली. 'उडान' योजनेचा मुख्य उद्देश देशातील प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विमानप्रवास स्वस्त आणि सुलभ करणे आहे. गोव्याहून शिर्डी आणि तिरुपतीला थेट विमानसेवा सुरु झाल्यास गोव्यातीलच नव्हे तर दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्र-कर्नाटकमधील भाविकांनाही मोठा फायदा होईल. तसेच धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचाही विकास होईल.

तात्काळ कार्यवाहीची विनंती

खासदार तानावडे यांनी केंद्र सरकारला या मागणीवर तातडीने आणि त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन केले. ही थेट विमानसेवा सुरु झाल्यास हजारो भाविकांचा प्रवास अत्यंत सोयीचा होईल आणि त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. ही मागणी गोव्यातील (Goa) भाविकांसाठी मोठी दिलासादायक ठरु शकते आणि 'उडान' योजनेच्या माध्यमातून धार्मिक स्थळांना जोडण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

SCROLL FOR NEXT