MP Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

MP Francisco Sardinha: 'दाबोळी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही'

'दाबोळी विमानतळावरील पार्किंगसंबंधी मार्गी लावणार'

दैनिक गोमन्तक

वास्को: मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद होईल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यात काहीच तथ्य नाही. दाबोळी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे दाबोळी विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. दाबोळी विमानतळ बंद होणार नसल्याचे आश्वासन सरकारने दिल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. ते दाबोळी विमानतळाच्या परिषद कक्षात बैठकीदरम्यान बोलत होते.

(MP Francisco Sardinha said Daboli Airport will not be closed)

बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सार्दिन यांनी दाबोळी विमानतळ सुरूच राहणार आहे. त्यासाठी आम्ही तेथे आहोत, असे स्पष्ट केले. गोव्यामध्ये मोपा व दाबोळी विमानतळाची गरज आहे. मोठी विमाने दाबोळी विमानतळावर उतरू शकत नाहीत. ती मोपावर उतरतील.

दाबोळी विमानतळावरील पार्किंगसंबंधी चर्चा करण्यात आली आहे. ही समस्या येत्या महिन्याभरात दूर करण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले आहे, असे सार्दिन यांनी सांगितले. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

उद्योजक नाना बांदेकर यांनीही यावेळी काही महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधले, दाबोळी विमानतळावरील नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण का होत नाही? यासंबंधी त्यांनी विचारणा केली. विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेस्टारंट असणे गरजेचे आहे. जेणेकरून महसूल वाढण्यास मदत होईल, असे मत त्यांनी मांडले.

अतुल जाधव यांनी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना अधिकाअधिक सुविधा मिळण्याची गरज व्यक्त केली. प्रवासी दोन तास अगोदर विमानतळावर येतात. परंतु तेथे कोणतीही मनोरंजनाची साधने नाहीत. विमानतळाजवळ वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होतात, त्यासंबंधी तोडगा काढण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सेंटर केसिंग कॉर्पोरेशन आपली सुविधा बंद करणार आहे. त्यामुळे एअर कार्गो कसा पाठवावा? हा प्रश्न उपस्थित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद चोपडेकर यांनीही दाबोळी विमानतळासंबंधी काही मुद्दे उपस्थित केले. दाबोळी विमानतळासमोर महामार्गावरील पथदीप लागत नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे नजरेस आणून दिले. तसेच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांना यावेळी देण्यात आले.

सल्लागार समितीच्या बैठकीत गुरुवारी दाबोळी विमानतळाच्या परिषद कक्षात घेण्यात आली. या बैठकीला दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक एस. सी. टी. धनंजय राव, सदस्य व उद्योजक नारायण बांदेकर, अतुल जाधव, शरद चोपडेकर तसेच संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT