CM Pramod Sawant | TCS Dainik Gomantak
गोवा

आता 'गोव्यातील' तरुणांना मिळणार ‘टीसीएस’चे मार्गदर्शन! उच्च शिक्षण संचालनालयाशी झाला करार

Goa News: उच्च शिक्षण संचालनालय आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यात सामंजस्य करार हा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग असून दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कुशल कामगार निर्माण करणे हा या कराराचा उद्देश आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पर्वरी: उच्च शिक्षण संचालनालय आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील तरुणांना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी बळ मिळेल, तसेच तरुण पिढी अधिक सक्षम आणि कार्यक्षम होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमी पणजी येथे केले.

उच्च शिक्षण संचालनालय आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यात दि. २६ सप्टेंबर रोजी झालेल्या सामंजस्य करारावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  बोलत होते.

यावेळी राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, उच्च शिक्षण परिषदेचे नियॉन मार्शेन आदी मान्यवर उपस्थित होते.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यावतीने स्मृती मुळ्ये, हर्ष नागपाल, अक्षय देशपांडे आणि राघव माथूर यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या स्मृती मुळ्ये यांनी सांगितले,की गोमंतकीय युवकांच्या करियरला दिशा देण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. विद्यार्थ्यांची सर्व तऱ्हेची तयारी करियर एज या माध्यमातून करून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी अन्य वक्त्यांनीही टीसीएसशी झालेल्या कराराचे स्वागत केले.

करियर एज ऑनलाईन व्यासपीठ

१)या कराराच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ‘करियर एज' नावाच्या ऑनलाईन व्यासपीठावरून राज्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

२)विद्यार्थ्यांची संवाद, मुलाखत तंत्र आणि पात्रता या अनुषंगाने तयारी करून घेऊन त्यांना  शिक्षणातून व्यावसायिक जीवनात सहजतेने प्रवेश मिळावा यासाठी अनुकूल वातावरण तयार करते.

असा आहे कराराचा उद्देश

उच्च शिक्षण संचालनालय आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यात सामंजस्य करार हा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग असून दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कुशल कामगार निर्माण करणे हा या कराराचा उद्देश आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT