MoU signed by Goa And Uttarakhand under Dekho Apna Desh: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'देखो अपना देश' या उपक्रमाच्या अनुषंगाने पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा आणि उत्तराखंड सरकारच्या अधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यातील पर्यटन वाढीला सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
गोवा सरकारचे पर्यटन, आयटी मंत्री रोहन खंवटे आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.
प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देणे. गोवा आणि उत्तराखंडला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी दोन्ही राज्यांमधील प्रवास सुलभ करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. दोन्ही राज्यांतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा करार एक मोठे पाऊल मानले जात आहे.
"भारताचा समृद्ध वारसा, समृद्ध संस्कृती पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. उत्तराखंड टूरिझमसोबत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत, आम्ही अध्यात्मिक आणि इको-टूरिझमवर लक्ष केंद्रित करण्यास उत्सुक आहोत." असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले.
"या भागीदारीद्वारे, सुंदर आणि प्राचीन मंदिरे दाखवली जातील. 'दक्षिण काशी' ते 'उत्तर काशी' जोडणाऱ्या सर्किटचा एक भाग म्हणून ते गोव्याला अधिक मजबूत पर्यटनस्थळ करेल. दोन्ही राज्यांच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्याचा आणि पर्यटकांना एक अनोखा आणि अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे." असेही खंवटे म्हणाले.
या सामंजस्य करारांतर्गत, दोन्ही राज्यांना उत्तराखंड आणि गोवा दरम्यान थेट उड्डाण कनेक्टिव्हिटीचा फायदा होईल, प्रवासाचा वेळ 7 तासांवरून 2.5 तासांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे पर्यटकांना दोन्ही राज्यांमधील प्रवास करणे सोपे होईल.
गोवा पर्यटन क्षेत्राशी करार आणि दोन्ही राज्यांतील पर्यटन सुधारण्यासाठी काम करण्यात आम्हाला आनंद होत आहे. असे उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज म्हणाले. हा सामंजस्य करार केवळ थेट कनेक्टिव्हिटीसह संयुक्त पॅकेजेस, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मानव संसाधन विकासाच्या संधी देखील उपलब्ध करेल.
गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही ठिकाणी पर्यटनाच्या विकासासाठी आम्ही उत्सुक आहोत. दोन्ही राज्यांचे पर्यटन विभाग साहसी पर्यटन उपक्रम, इकोटुरिझम, अध्यात्मिक पर्यटन आणि वेलनेस टुरिझमसह अशा विविध पर्यटन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त पॅकेजवर काम करतील. असे सतपाल महाराज म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.