Kareena Kapoor Khan: रात्र गोव्याची! करीना कपूरने शूट दरम्यान शेअर केला 'रेड लिप' लुक

करीनाने गोव्यात रात्रीच्यावेळी काढलेला सेल्फी चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे.
Kareena Kapoor Khan In Goa
Kareena Kapoor Khan In Goa Instagram

Kareena Kapoor Khan In Goa: करीना कपूर खान, सध्या तिच्या आगामी 'द क्रू' चित्रपटाचे गोव्यात चित्रीकरण करत असून, तिने गोव्यातून एक फोटो शेअर केला आहे. करीनाने काळ्या रंगाचा टॉप घातलेला असून, ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. करीनाने गोव्यात रात्रीच्यावेळी काढलेला सेल्फी चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे.

(‘The Crew’ Shoot Update)

करीनाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याला "गोवा नाईट्स विथ अ रेड लिप" असे कॅप्शन दिले आहे. करीना या लुकमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे. दरम्यान, गोव्यात सध्या 'द क्रू' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. अलीकडेच अभिनेत्री क्रिती सॅनन आणि तब्बू देखील याच चित्रपटाच्या शेड्यूलसाठी गोव्यात आले होते.

करीनाने तिच्या व्यस्त वेळापत्रकातून तिच्या चाहत्यांसाठी थोडा वेळ काढत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून अपडेट शेअर केली आहे. काळ्या रंगाच्या कपड्यात करीना सुंदर दिसत असून, सेल्फीत तिच्या लाल ओठांचा रंग हायलाइट होत आहे.

याआधी स्वित्झर्लंडमध्ये कौटुंबिक सुट्टी घेतल्यानंतर केनियामध्ये सुट्टी घालवली. दोन मुलांची आई असणारी करीना कपूर आजही तितकीच सुंदर, फिट आणि फाईन आहे.

kriti sanon And Tabbu in Goa
kriti sanon And Tabbu in GoaInstagram
Kareena Kapoor Khan In Goa
Goa Petrol-Diesel Price: इंधन भरण्यापूर्वी गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

दरम्यान, यापूर्वी अभिनेत्री क्रिती सॅननने तब्बूसोबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्या दोघी विमानात चहाचा आनंद घेताना दिसत आहेत. या व्हिडिओला "चाय पे चर्चा. मिसिंग यू करीना" असे कॅप्शन क्रितीने दिले आहे. त्यावर करीनाने बिस्किट कुठे आहेत? उद्या भेटू असे उत्तर दिले.

त्यानंतर क्रिती सॅननने पुन्हा करीनाला उत्तर दिले. गोव्यातील बिस्किटांसोबत आम्हाला अॅडस्ट करावे लागेल, तब्बूने दिल्लीचा बॉक्स संपवला आहे. असे क्रितीने म्हटले आहे.

दरम्यान, सध्या 'द क्रू' चित्रपटाच्या चित्रीकरणात करीना व्यस्त आहे. तिथून करीना अपडेट शेअर करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com