Benaulim Beach Dainik Gomantak
गोवा

मोठी दुर्घटना टळली! बाणावलीत मासेमारीसाठी गेलेली बोट उलटली; सर्व मच्छिमार बांधवांची सुरक्षित सुटका

Benaulim Beach: राज्यात गेल्या दोन महिन्याभरापासून बंद असणाऱ्या मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांत राज्यात पावसानं हाहाकार माजवला.

Manish Jadhav

राज्यात गेल्या दोन महिन्याभरापासून बंद असणाऱ्या मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांत राज्यात पावसानं हाहाकार माजवला. राजधानी पणजीसह अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. जून-जुलै महिन्यात समुद्रही खवळलेला असतो त्यामुळे दरवर्षी सरकार या दोन महिन्यात मासेमारी बंद ठेवते.

तत्पूर्वी, बाणावलीतून (Benaulim) समोर आलेल्या बातमीने एकच हल्लकल्लोळ उडाला. बाणावली येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमार बांधवांची बोट अचानक उलटली. मात्र तात्काळ उपस्थतीतांनी प्रसंगसावधान राखत बोटीला समुद्रकिनारी आणले. अशारितीने बोटीतील मच्छिमार बांधव बचावले. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोलवा समुद्रकिनाऱ्यावरुन अशीच अपघाताची घटना समोर आली होती. हवामान आणि सुमद्राचा अंदाज न घेताच समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर उलटली होती. बोटीमधील मच्छिमार बांधवांनी आरडाआरोड करताच, किनाऱ्यारील जीवरक्षक पर्यटक पोलिसांनी (Police) तात्काळ खवळलेल्या समुद्रात बुडणाऱ्या 13 मच्छिमारांसह बोटही किनारी आणली होती. कोलवा किनाऱ्यावरील जीवरक्षक आणि पर्यटक पोलिसांनी त्यांचा आवाज ऐकताच त्यांच्या दिशेने आगेकूच करत त्यांना रेस्क्यू केले होते.

बोटीत मच्छिमार आणि मदतनीस मिळून 13 जण होते. हे सर्वजण मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये गेले होते. मात्र आता त्यांना सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले. बचावकार्यादरम्यान, एक जीवरक्षक साहिल तुळसकर यांना दुखापत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT