Birsa Munda  Dainik Gomantak
गोवा

Birsa Munda: 'प्रत्येक गावागावांत बिरसा मुंडा जन्माला यावेत'; तवडकरांच्या उपस्थितीत महामार्गावरून मोटरसायकल रॅलीला सुरुवात

Birsa Munda Jayanti: पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित आदिवासी समाजाचे नेते बिरसा मुंडा यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणे या नात्याने सभापती बोलत होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Birsa Munda Jayanti Motorcycle Rally

पेडणे: प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतानाच बिरसा मुंडा यांनी आपली शेती, मातीचे रक्षण केले. त्यांनी देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली व ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. असा युवक आपल्या सत्तेला आव्हान देऊ शकतो याचा विचार करून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली व कारस्थान करून मारले. बिरसा मुंडांची प्रेरणा घेऊन गोव्यातील प्रत्येक गावागावांत बिरसा मुंडा जन्माला यायला हवेत. यासाठी ही मोटरसायकल मिरवणूक प्रत्येक तालुक्यातून फिरणार आहे, असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी पत्रादेवी येथे केले.

पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित आदिवासी समाजाचे नेते बिरसा मुंडा यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणे या नात्याने सभापती बोलत होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक, तोरसेच्या सरपंच छाया शेट्ये, ट्रायबल वेल्फेअर इन्स्टिट्यूटच्या संचालिका वीणा नायक, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तथा चांदेल हसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस, कासारवर्णे ग्रामपंचायतीच्या सरपंच अवनी गाड, पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, सरपंच अजय कळंगुटकर, धारगळचे जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथन कलशावकर व जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, उपजिल्हाधिकारी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंती सोहळ्याचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी पेडणेतील विविध महिला मंडळाकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जयंती साजरी केली. दरम्यान, सभापती रमेश तवडकर यांनी पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकावर जाऊन पाहणी केली. शिक्षक किशोर किनळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. चांदेल-हसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच तथा भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.

त्यानंतर शेकडोंच्या संख्येने उपस्थित दुचाकीवरून पत्रादेवी ते करासवाडापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून रॅली काढली. यावेळी दुचाकीस्वारांनी भगव्या रंगाचे टी-शर्ट परिधान करून मिरवणूक काढली. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पडद्यावर उपस्थित लोकांशी ‘मन की बात’मधून संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देशप्रेमाची भावना निर्माण करूया

अवघ्या २५ वर्षांच्या आपल्या आयुष्यात एक युवक देशासाठी कशाप्रकारे योगदान देऊ शकतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भगवान बिरसा मुंडा हे असून युवकांनी त्यांचा आदर्श घ्यावा. या नेत्याची प्रतिमा लोकांसमोर यावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी साखळी येथे केले.गोव्याची संस्कृती, ग्रामीण परंपरा जगाच्या पाठीवर न्यायची आहे. आमची सुसंस्कृत परंपरा व संस्कृती हीच आमची श्रीमंती आहे. आमचा गाव व लोकांना समृद्ध करण्यासाठी आम्ही वावरत आहोत. बिरसा मुंडा यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करून देशप्रेमाची भावना निर्माण करूया, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी साखळी येथील कार्यक्रमात केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

SCROLL FOR NEXT