Candolim Murder Case 
गोवा

Candolim Murder Case: चार वर्षीय मुलाचा मृत्यू कसा झाला, शवविच्छेदन अहवाल काय सांगतो?

मृत मुलाचे वडील मंगळवारी संध्याकाळी जकार्ताहून भारतात परतल्यानंतर त्यांनी मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास अधिकाऱ्यांना संमती दिली.

Pramod Yadav

Postmortem report of 4 yr old killed in Goa: आईनेच चार वर्षीय मुलाचा खून केल्यानंतर खळबळ निर्माण झालेल्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मृत मुलाचे वडील मंगळवारी संध्याकाळी जकार्ताहून भारतात परतल्यानंतर त्यांनी मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास अधिकाऱ्यांना संमती दिली.

उशी अथवा हाताने मुलाचा गळा दाबून खून केला असावा असे शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

उशी अथवा हाताने मुलाचा गळा दाबून खून केला असावा असे शवविच्छेदन करणारे डॉक्टरांनी म्हटले आहे.

मुलाच्या शरीरावर रक्त किंवा जखमेचे निशाण आढळून आलेले नाहीत. मात्र, गुदमरल्याने छाती आणि चेहऱ्याचा भाग फुगला आहे. मृत्यूला 36 तास उलटल्याने शरीरात रिगर मॉर्टिस आढळून आलेला नाही. हत्येवेळी मुलाने धडपड केली असावी पण, त्याची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत, असे शवविच्छेदन करणारे डॉ. कुमार नाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

बाळाच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सूचना सेठला आज (9 जानेवारी) सुनावणी साठी म्हापसा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुलाच्या पार्थिवावर बेंगळुरु येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT