Mother commits suicide with 5-year-old son in Goa Dainik Gomantak
गोवा

तिच्या टोकाच्या भूमिकेमुळे बिचाऱ्या मुलाचाही हकनाक बळी

पर्येत हळहळ : पतीचा संशय; रागातून उचलले ‘ते’ पाऊल!

Shreya Dewalkar

पर्ये: बेलवाडा-पर्ये, सत्तरी येथील सुजाता विश्वनाथ नाईक हिने शुक्रवारी रात्री आपल्या पाच वर्षीय मुलासह आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. सुजाताचा पती तिच्यावर संशय घेत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून सुजाता बेपत्ता झाली. सकाळी मुलाला साखळीत एका नर्सरी शाळेमध्ये घेऊन गेल्यावर संध्याकाळी ती घरी परतलीच नाही.

(Mother commits suicide with 5-year-old son in Goa)

रात्री तिच्या घरच्यांनी चौकशी केली. पण ती सापडत नसल्याने वाळपई पोलिस स्थानकात ती मुलासह बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पण आज दुपारी तिचा मृतदेह मिरामार किनाऱ्यावर मिळाल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. नंतर तिच्या मुलाचा मृतदेह जुने गोवे येथे सापडल्याने हे आत्महत्येचे प्रकरण स्पष्ट झाले.

या दांपत्याला पाच वर्षांचा तेजस हा मुलगा होता. त्यातच त्या गोंडस मुलाला बोलण्या-ऐकण्याचे काहीसे व्यंग होते. मुलाच्या व्यंगत्वामुळे आई व्यथित झाली असावी, असे सांगण्यात येते. आजच्या तिच्या या टोकाच्या भूमिकेमुळे बिचाऱ्या मुलाचा बळी गेला. तिचा पती काही महिन्यांपूर्वीच गोमेकॉतील नोकरीवर रूजू झाला होता.

यापूर्वी पोलिसांनी घडविला होता समेट

या पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होता, असे कारण पुढे आले आहे. सुजाताचा पती तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घ्यायचा. यासंबंधीचे एक प्रकरण एप्रिल महिन्यामध्ये घडले होते. त्याची तक्रार वाळपई पोलिसांत नोंदवली होती. त्यावेळी पोलिसांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणला होता. पण त्यानंतरही त्यांच्यातील संबंध सुधारले नसल्याने त्याची परिणती या घटनेत झाली असावी, असे बोलले जाते. या ताणतणावामुळेच सुजाताने टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT