Goa Carnival 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Viva Carnival 2025: शनिवारपासून गोव्यात 'किंग मोमो'ची राजवट; सुरु होणार कार्निव्हलचा जल्लोष

Goa Carnival 2025 Festival: हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक या आनंदोत्सवात सहभागी होणार आहेत असे आरोलकर यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Viva Carnival 2025

पणजी: गोवा कार्निव्हल २०२५ रंगतदार उत्सव संगीत आणि जल्लोषाने प्रकाशमान होण्यासाठी सज्ज झाला आहे. गोवा पर्यटन विभागाने क्लिवेन मॅथ्यू फर्नांडिस यांची 'किंग मोमो' म्हणून निवड केली आहे.

पर्वरीतील कार्निव्हल रद्द झाल्याने यावर्षी १ मार्च रोजी पणजीतून सुरुवात होणार असून २ मार्च रोजी मडगाव, ३ मार्च रोजी वास्को आणि ४ मार्च रोजी मोरजी व म्हापसा येथे कार्निव्हलच्या मिरवणूक काढण्यात येणार आहेत. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी 'किंग मोमो' क्लीवेन मॅथ्यू फर्नांडिस आणि जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्निव्हलचे अधिकृत गाणेही लाँच करण्यात आले. या भव्य सोहळ्यात रंगीत फ्लोट परेड, उत्साही संगीत, आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणे आणि गोव्याच्या अनोख्या परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक या आनंदोत्सवात सहभागी होणार आहेत असे आरोलकर यांनी सांगितले.

पणजीत मार्ग तोच

पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर यांनी सांगितले की, पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीसाठी मागील मार्गच राहील, मात्र एम. जी. रोडवर वाहतूक वळविण्यात येणार आहेत. पोलिसांनी या संदर्भात आपली स्वतंत्र योजना आखली आहे. तसेच, स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, त्यांनी सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

सर्वधर्मीयांनी एकत्र यावे

किंग मोमो क्लिवेन मॅथ्यू फर्नाडिस यांनी या सोहळ्याचे स्वागत करत हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या सर्व धर्मीयांनी कार्निव्हलला उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे. गोवा पर्यटन विभागाने या प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या माध्यमातून गोव्याच्या समृद्ध आणि बहुसांस्कृतिक परंपरेचा प्रचार करत आहे. 'किंग मोमो' च्या आनंदभरल्या हाकेसह गोवा कार्निव्हल २०२५ हा रंग, ताल आणि उत्सवाच्या ऊर्जेचा एक भव्य सोहळा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT