Crematorium In Ponda Dainik Gomantak
गोवा

Crematorium In Ponda: फोंडा तालुक्यात सर्वांत जास्त स्मशानभूमी

Crematorium In Ponda: राज्यातील पंचायतींच्या संख्येपेक्षा दुपटीने अंत्यविधी करण्यासाठी जागा

दैनिक गोमन्तक

विलास ओहाळ

Crematorium In Ponda: राज्यात अनेक ठिकाणी स्मशानभूमी किंवा दफनभूमीत त्या पंचायत क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीवर मृत्यू पश्‍चात अंत्यसंस्कार करण्यात अटकाव झाल्याचे प्रकार घडलेले आहेत.

विशेष बाब म्हणजे राज्यातील 191 पंचायतीच्या क्षेत्रांतील स्मशानभूमीच्या संख्येवर नजर टाकली तर पंचायतीच्या मालकीच्या व खासगी स्वरुपातील स्मशानभूमींची संख्या 399 आहे.

List of Crematorium In Goa

यात सर्वात जास्त फोंडा तालुक्यात एकूण 85 पैकी पंचायतीच्या मालकीच्या 62 , तर 22 या खासगी मालकीच्या आहेत.

राज्य पंचायत संचालनालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते की, राज्यात स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्येही पंचायतीची आणि खासगी मालकी आहे.

यापूर्वी अनेक पंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करून राहणाऱ्या मूळ गोमंतकीयावर मृत्यू पश्‍चात तो स्थानिक नसल्याने त्याच्यावर इतरत्र पैसे भरून किंवा नगरपालिका, महानगरपालिकेच्या ठिकाणी अंत्यसंस्कार कराव्या लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर फोंडा तालुक्यात ३१ पंचायती आहेत आणि त्याठिकाणी 63 पंचायतीच्या आहेत, तर 22 खासगी स्मशानभूमी आहेत. त्यावरून सहजपणे अंदाज बांधता येतो की, वाड्या-वस्त्यांमुळे स्मशानभूमींची संख्या वाढलेली आहे.

मात्र, काणकोण तालुक्यात 8 पंचायती आहेत. तेथे 12 पैकी 6 पंचायतीच्या, तर 6 खासगी स्मशानभूमी आहेत. त्याचबरोबर सासष्टी तालुक्यात 46 पंचायती आहेत. तेथे एकूण 8 स्मशानभूमींपैकी पंचायतीच्या 5, तर 3 खासगी स्मशानभूमी आहेत.

दफनभूमींच्या संख्येवर नजर टाकली तर राज्यात एकूण 212 दफनभूमी आहेत. त्यात बार्देश तालुक्यात 32 सार्वजनिक आणि 6 खासगी दफनभूमी आहेत. सर्वात कमी 3 दफनभूमी सत्तरी तालुक्यात असून, त्याठिकाणी 2 सार्वजनिक आणि 1 खासगी दफनभूमी आहे. (पूर्वार्ध)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT