Water Sources In Goa: राज्यात झरे, विहिरींच्‍या पाण्‍यात अचानक घट..!

Goa Water Sources Depletion: कामरखाजन-म्हापसा येथील प्रकार : मलनि:स्सारण प्रकल्प कारणीभूत : स्‍थानिकांचा दावा
Goa Water Source Depletion
Goa Water Source DepletionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Water Sources Depletion: दसऱ्याच्‍या दिवशीच कामरखाजन-म्हापसा येथील स्थानिकांच्या विहिरींमधील पाण्याच्या पातळीत सकाळपासून अचानकपणे घट होण्यास सुरूवात झाल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला.

याला मलनि:स्सारण प्रकल्प (एसटीपी) कारणीभूत असल्याचा आरोपही त्‍यांनी केला. मागच्‍या एप्रिल महिन्‍यात अशाच प्रकारे लोकांच्या विहिरीतील पाणी घटले होते.

Goa Water Source Depletion
Goa Tiger Project: व्‍याघ्र प्रकल्‍पासंदर्भात अधिसूचना काढण्‍याची मुदत संपली; मात्र प्रकल्‍पाचा रेटा कायम

स्थानिकांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पेडे येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस्थळी काही बोअरवेल खोदल्याने ही स्थिती उद्भवली आहे. तसेच, एसटीपीच्‍या मॅनहोलमधून मागील काही दिवसांपासून पाणी सातत्याने उपसले जात असल्याने कामरखाजनमधील घरगुती विहिरींवर परिणाम झाला आहे.

स्थानिक नागरिक जॉन लोबो म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस्थळी बोअरवेल खोदल्याचे समजते. तिथे मोठ्या प्रमाणात बोअरवेलच्या साहाय्याने पाणी उपसले जात असल्याने कामरखाजनमधील लोकांच्या विहिरींमधील पाण्‍याच्‍या पातळीत कमालीची घट झाली आहे. काहींच्या विहिरीतील पाणी पूर्णतः आटले आहे. स्थानिक नगरसेवक, आमदार तसेच प्रशासनाने यात लक्ष घालावे.

विशेष म्हणजे, कामरखाजनमधील अनेक ठिकाणांहून टँकरने इतरत्र पाणीपुरवठा केला जातो. आणि अशा प्रकारे कामरखाजनमधीलच विहिरींचे पाणी आटल्यास कसे होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लोकांनी उठविला होता आवाज

कामरखाजन परिसरात मलनि:स्सारण प्रकल्प उभा राहिला असून, तो म्हापसा मतदारसंघापुरता मर्यादित आहे. अशावेळी कामरखाजनमधील या प्रकल्पाच्या मॅनहोल तसेच चेंबर्समधील ब्लॉकेज (पाणी) काढण्यासाठी एप्रिल २०२३ मध्ये चाचणी सुरू केली असता, भूगर्भातील पाण्याची पातळी अचानकपणे कमी होण्यास सुरूवात झाली. परिणामी विहिरींमधील पाणी आटले. लोकांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सूचित करून सदर चाचणीचे काम त्वरित थांबविले होते.

मलनि:स्सारण प्रकल्पाचे मॅनहोल व चेंबर्स हे बंद केले जातील, असे आश्वासन मध्‍यंतरी संबंधितांकडून स्थानिकांना देण्‍यात आले होते. परंतु आजवर ते पूर्ण झालेले नाही. अजूनही पाणी उपसले जातेय. अगोदर नळांना पाणी येत नाही, त्यात विहिरी आटल्यास स्थानिकांचे खूपच हाल होणार आहेत.

- जॉन लोबो, कामरखाजन

विहिरींचे पाणी घटले असून नैसर्गिक झरा तर पूर्णतः आटला आहे. झरीचे पाणी स्थानिक कपडे धुण्यासाठी तसेच इतर कामासाठी वापरायचे. हा नैसर्गिक झरा आहे. तो कधीच कोरडा पडला नव्हता. एसटीपीच्या मॅनहोलमधून पाणी दबावाने पंपिंग करत असल्याने विहिरी तसेच झरीतील पाणी आटले आहे.

- शर्वाणी पित्रे, कामरखाजन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com