Morpirla Election Dainik Gomantak
गोवा

Morpirla News: मोरपिर्ला निवडणुकीत '91 टक्के' मतदान! विक्रमी प्रतिसादामुळे निकालाची उत्सुकता

Morpirla Panchayat: मोरपिर्ला ग्रामपंचायतीच्या प्रभाग सहासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ९१ टक्के मतदान झाले. या प्रभागात एकूण ३४० पैकी ३११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

गोमन्तक डिजिटल टीम

Morpirla Panchayat Election

केपे: मोरपिर्ला ग्रामपंचायतीच्या प्रभाग सहासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ९१ टक्के मतदान झाले. या प्रभागात एकूण ३४० पैकी ३११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उद्या २१ रोजी केपे मामलेदार कार्यालयात मतमोजणी होणार असून या निवडणुकीत बाबू कवळेकर व आमदार एल्टन डिकोस्टा यांनी आपापले उमेदवार रिंगणात उभे केल्याने या निवडणुकीत बरीच रंगत आल्याचे स्थानिकांनी सांगितले. इतर पंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मोरपिर्ला पंचायतीत सर्वात जास्त मतदान झाल्याचे दिसून आले आहे.

मोरपिर्ला पंचायतीच्या प्रभाग सहामधील पंच सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी हे मतदान झाले. मोरपिर्ला पंचायत ही पूर्वी बाबू कवळेकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहायची, पण गेल्या निवडणुकीत कवळेकर यांना बराच संघर्ष करावा लागला होता. माजी आमदार बाबू कवळेकर यांनी सोनू भिवा वेळीप, तर आमदार एल्टन डिकोस्टा यांनी तुळशीदास वेळीप यांना समर्थन दिले होते.

या निवडणुकीत दोघांमध्ये सरळ लढत झाल्याने उद्याच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कवळेकर यांनी आपले वर्चस्व राखून ठेवण्यासाठी या निवडणुकीत बरेच प्रयत्न केले असून या विरोधात डिकोस्टा यांनीसुद्धा कवळेकर यांना शह देण्यासाठी आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी जोर लावल्याने उद्या होणाऱ्या निकालावर कुणाचे वर्चस्व राहणार हे दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

Merces Court Incident: मेरशी न्यायालयात खळबळ! पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने पोक्सो आरोपी गंभीर जखमी

IND vs WI 5th T20I, Weather Report: रोमांचक मालिका निर्णायक टप्प्यावर, पण पावसानं वाढवली धाकधूक; बंगळुरुचं हवामान ठरवणार भारत-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

SCROLL FOR NEXT