Sankalp Amonkar Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: मुरगाव बंदरात घडलेल्या प्रकाराबाबत आमदार आमोणकरांनी मागितली सर्वांची माफी

Goa Taxi: अमेरिकन पर्यटकांबरोबर गैरसमजुतीतून हा प्रकार घडला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Taxi: मुरगाव बंदरात गुरुवारी अमेरिकन पर्यटकांबरोबर टॅक्सीचालकांनी केलेले वर्तन योग्य नाही. परंतु हा प्रकार गैरसमजुतीतून झालेला आहे, त्यामुळे त्याची जबाबदारी आपण स्वीकारत आहे, असे म्हणत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सर्वांची माफी मागितली.

वास्को भाजप कार्यालयात काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुरगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमोणकर म्हणाले, अमेरिकन पर्यटकांबरोबर गैरसमजुतीतून प्रकार घडला आहे. या घटनेची आमदार म्हणून आपली जबाबदारी आहे. मी गोव्याबाहेर होतो. येथे असतो तर हा प्रकार घडला नसता.

चुकीचे आरोप

टॅक्सीवाल्यांवर जे आरोप करण्यात आले आहेत, त्याविषयीचे जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. परंतु त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहे. टूर ऑपरेटर आणि टॅक्सी चालकांमध्ये गैरसमज झाल्याने वरील प्रकार घडला आहे.

दोन्ही संघटनांना जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण क्षमापत्र देण्यास सूचित करणार आहोत. टॅक्सी चालक संघटना व टूर ऑपरेटर्स यांच्यात यापूर्वी असा प्रकार घडला नाही. या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असे म्हणत आमोणकर यांनी माफी मागितली.

अमेरिकन पर्यटकांची अडवणूक करणे आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या बस चालकाला मारहाण करणे या आरोपाखाली काल मुरगाव पोलिसांनी दोन टॅक्सीचालकांना अटक केली आहे. तसेच 9 जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला आहे.

मुरगाव हार्बर पर्यटक क्रुझ जेटीवर विदेशी पर्यटकांना गोवा दर्शनासाठी नेण्यासाठी आलेल्या बस चालकाला टॅक्सी व्यावसायिकांनी 14 डिसेंबर रोजी मारहाण केली होती. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी पोलिस वास्को उपअधीक्षक शेख सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगाव पोलिसांनी दोन टॅक्सी चालकांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी आज दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांच्याशी या संदर्भात चर्चा करून भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या. पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, की टॅक्सीचालकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. वाहतूक खात्याच्या मंत्र्यांना अशा टॅक्सीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची आपण सूचना करणार आहोत.

यांच्यावर झाली कारवाई

बस व्यावसायिकांच्या तक्रारीवरून टॅक्सी चालक आकाश दुर्भाटकर, ओमकार होन्नावरकर यांना अटक करण्यात आली. त्याच्यावर भा. दं. स. 341, 504, 322 कलमाखाली गुन्हा नोंद करून अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास मुरगावचे पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अदित्य नाईक गावकर करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT