Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : मुरगाव बंदर वापरणार सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुध्द केलेले पाणी; जलवाहिनीच्या कामास सुरवात

Vasco News : मुरगाव काटे बायणा समुद्र किनारी भागातील मच्छीमार बांधवांनी येथील सार्वजनिक बांधकाम मलनिस्सारण प्रकल्पातील पाणी समुद्रात जाते. त्यावर राज्य सरकारने उपाय काढावा अशी मागणी येथील मच्छीमार व्यावसायिकांनी केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वास्को, मुरगाव काटे बायणा येथील सार्वजनिक बांधकाम मलनिस्सारण प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुध्द केलेले पाणी मुरगाव बंदरात पुरवण्यात येणार आहे.

यासाठी मुरगाव बंदर प्राधिकारणापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे उद्‍घाटन आमदार संकल्प आमोणकर व गोवा मलनिस्सारण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष निवृत्ती पार्सेकर उपस्थितीत झाले. अंदाजे २ कोटी ७० लाख रुपये खर्चून ही जलवाहिनी बसविण्यात येणार आहे.

मुरगाव काटे बायणा समुद्र किनारी भागातील मच्छीमार बांधवांनी येथील सार्वजनिक बांधकाम मलनिस्सारण प्रकल्पातील पाणी समुद्रात जाते. त्यावर राज्य सरकारने उपाय काढावा अशी मागणी येथील मच्छीमार व्यावसायिकांनी केली होती. यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मलनिस्सारण प्रकल्पात प्रक्रिया केलेल्या पाणी भूमिगत वाहिनीव्दारे औद्योगिक क्षेत्राला पुरविण्याची गरज असल्याचे सांगितले होते.

तसेच माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याची पाहणी करून प्रक्रिया केलेले हे पाणी चांगल्या कार्यासाठी वापरण्यासाठी सल्ला दिला होता. त्यानुसार काटे बायणा सार्वजनिक बांधकाम मलनिस्सारण प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी, मुरगाव पतन प्राधिकरणाला देण्याचे ठरविले असल्याचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने काटे बायणा ते एमपीए मध्ये अंदाजे तीनशे मिटर भूमिगत प्रक्रिया केलेले सांडपाणी भूमिगत वाहिनीतून नेण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य मलनिस्सारण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष निवृत्ती पार्सेकर, बायणा सार्वजनिक बांधकाम मलनिस्सारण प्रकल्पातील कार्यकारी अभियंता वरद सुर्लकर, कनिष्ठ अभियंता मिथिल नाईक, समीर कोरगावकर, शिवराम गारोडी, आदिती सरदेसाई, चंद्रहास पांढरे , महेश नाईक, क्लिफ वाझ,कंत्राटदार व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

वाहने धुणे, उद्यानासाठीही वापर शक्य :

मलनिस्सारणमधील प्रक्रिया केलेले पाणी औद्योगिक क्षेत्राबरोबर वाहने धुण्यासाठी, उद्यानात व इतर गरज असलेल्या ठिकाणी वापरता येते, अशी माहिती निवृत्ती पार्सेकर यांनी दिली. पणजीनंतर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा उपयोग करणारे मुरगाव बंदर दुसरे ठरले आहे.

मच्छीमारांना दिलासा

बायणा येथील पारंपरिक मच्छीमारांसाठी दिलासा देणारा प्रकल्प असल्याचे सांगितले. प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडले जाणार नाही, परंतु, विविध गरजांसाठी एमपीएला पुरवले जाईल. २.७ कोटींचा प्रकल्प तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे, असे आमोणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT