Mormugao Palika Building Dainik Gomantak
गोवा

वेतनप्रश्‍नी मुरगाव पालिका कर्मचारी आक्रमक

दैनिक गोमन्तक

वास्को : आठवड्यापूर्वी दोन दिवसात बँकेतून कर्ज काढून खात्यात वेतन जमा केले जाईल, असे आश्वासन देऊनही मुरगाव पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांनी आश्वासनपूर्ती करू न शकल्याने मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. दोन दिवसात वेतन खात्यात जमा न झाल्यास काम बंद ठेवण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू हे वेतन प्रश्‍नी लक्ष घालत नसल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे. (Mormugao Palika Workers Protest News Updates)

'अ' दर्जाची मुरगाव (Mormugao) नगरपालिका थकबाकी वसुलीत सपशेल अपयशी ठरल्याने मेटाकुटीस आली आहे. याचा फटका मात्र पालिका कर्मचाऱ्यांना बसत आहे. पालिकेच्या अधोगतीला जबाबदार कोण, आज प्रश्न सर्वांना पडला आहे. अधिकारी वर्गाला आपले वेतन वेळेवर मिळत आहे. कर्मचाऱ्यांना मात्र वेतनासाठी प्रत्येक महिन्याला झगडावे लागते, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना (Workers) सतावत आहे. वेतनासाठी मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांकडे गेले तर एकच उत्तर कर्मचाऱ्यांना मिळते, ते म्हणजे पालिकेची थकबाकी वसुली झाली नाही.पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. पुढच्या महिन्यात बघू, हेच उत्तर वारंवार मिळत असल्याने काम करूनही वेतन मिळत नसेल तर उदरनिर्वाह कसा चालवायचा,असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांना सतावत आहे.

मुलांची शालेय फी, घरभाडे, कर्जबाजारी असलेल्यांना बँका (Bank) हप्ता वसुलीसाठी तगादा लावतात. हप्ता वसूल झाला नाही तर कर्जाच्या मुद्दलात वाढ होते. याच विवंचनेत कर्मचारी सध्या दिवस ढकलत आहेत. गतवर्षी 22 डिसेंबरला वेतन हातात पडले होते. मात्र जानेवारीचे वेतन फेब्रुवारी महिना संपत आला तरी खात्यात जमा होत नाही. आणखी एक महिना वेतन बँकेत जमा झाले नाही, तर बँक खात्यातून मिळणारे वेतन हातात मिळणारच नाही. कारण तोपर्यंत कर्ज हप्त्यात वाढ होईल,अन् बॅंक आपले हप्ते बरोबर वसूल करून घेईल.याच विवंचनेत पालिका कर्मचारी सध्या वावरत आहेत.

पालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी दोन दिवसात वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, तर आपण कर्मचाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा गेल्या आठवड्यात दिला होता. मात्र त्यांचाही आजपर्यंत काहीच पत्ता नाही. त्यामुळे कर्मचारी अधिकच वैफल्यग्रस्त झाले आहेत. वेतन प्रश्न असूनही कामगार संघटनेचे अध्यक्ष फिरकले नसल्याचे कर्मचाऱ्यांत कडून सांगण्यात आले. तसेच फोनही घेण्यास टाळत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT