Mormugao Dainik Gomantak
गोवा

Mormugao: कचरा न देणाऱ्यांना येणार ‘नोटिसा’! मुरगाव पालिकेचा निर्णय; शुल्क न भरल्यास 200 रुपये दंडाची तरतूद

Mormugao Municipal Council: काही घरमालक कचरा शुल्क देण्याऐवजी आपला कचरा रस्त्याकडेला तसेच इतरत्र टाकतात. त्यामुळे काही ठिकाणी कचरा जमा होऊ लागला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: दारोदारी कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या कामगारांकडे कचरा न देणाऱ्या तसेच कचरा शुल्क न भरणाऱ्या प्रत्येक प्रभागातील दहा घरमालकांना प्रायोगिक तत्त्वावर नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

भविष्यात जे कचरा शुल्क देण्यास टाळाटाळ करतील, त्यांनाही नोटिसा पाठवून कारवाई करण्यात येणार आहे.

मुरगाव पालिका मंडळाच्या घनकचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व नगरसेवक नारायण बोरकर यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत कचरा शुल्क देण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला होता.

काही घरमालक कचरा शुल्क देण्याऐवजी आपला कचरा रस्त्याकडेला तसेच इतरत्र टाकतात. त्यामुळे काही ठिकाणी कचरा जमा होऊ लागला आहे. त्यांना वचक बसावा तसेच त्यांनी कचरा शुल्क द्यावे यासाठी त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार काही घरमालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

त्यांच्याकडून २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतही त्यांच्याकडून कचरा रस्त्यावर टाकण्याचे प्रकार थांबले नाहीत, तसेच कचरा शुल्क न दिल्यास दंडाच्या रकमेत वाढ होणार आहे. आतापर्यंत पाच प्रभागांतील प्रत्येकी दहा घरमालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. इतर प्रभागांतील नावे मिळाल्यावर त्यांनाही नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.

मुख्याधिकाऱ्यांकडून विक्रेत्यांना इशारा

मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी येथील भाजी मार्केटात फेरी मारून तेथील पाहणी केली. तेथे रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले, तर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी विक्रेत्यांना सांगितले.

तेथील रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे जे विक्रेते सॅनिटेशन फी देण्यास टाळाटाळ करतात त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

मुरगाव पालिका निरीक्षकांनी तेथे योग्य लक्ष ठेवावे. प्रतिदिन कोणती कारवाई केली, त्यासंबंधीचे व्हिडिओ पाठविण्याचे निर्देश नाईक यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

SCROLL FOR NEXT