
वास्को: सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३( कोटपा)चे उल्लंघन केल्याप्रकरणी मुरगाव तालुका अंमलबजावणी पथकाने अकराजणांविरोधात कारवाई करून २२०० रुपयांचा दंड वसुल केला.
मुरगावचे संयुक्त मामलेदार गजेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सदर कारवाई केली. या पथकात ‘गोवाकॅन’चे समन्वयक रोलँड मार्टिन्स, मामलेदार कार्यालयातील सर्कल इन्स्पेक्टर हनुमंत मांद्रेकर, तलाठी गौतम सांळुके, वास्को पोलिस स्थानकाचे पोलिस शिपाई वेंकट प्रसाद यांचा समावेश होता.
मुंडवेल वाडे येथे सदर पथकाने काही किराणा, दारू, औषधालय, फास्ट फूड दुकानांची तसेच रेस्टारंट्सची तपासणी केली. त्यावेळी काहीजणांनी कोटपाच्या कलम ४ व ६( अ)चे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला. तपासणी दरम्यान पथकाला काही आस्थापनामद्ये कोटपा अंतर्गत धूम्रपान प्रतिबंधक सूचना फलक तसेच ‘एफएसएसएआय’ नोंदणी प्रमाणपत्र योयरित्या प्रदर्शित केले नसल्याचे आढळून आले.यासंबंधी गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करण्यात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.