बेवारस वाहने
बेवारस वाहने Dainik Gomantak
गोवा

Mormugao पालिकेचा कारवाईचा धडाका सुरुच; 61 बेवारस वाहने उचलली

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: मुरगाव नगरपालिका व वाहतुक पोलिसांनी वास्को शहरातील बेवारस भंगार वाहने काढण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. शनिवार (दि.12) पर्यन्त मुरगाव नगरपालिकेने 61 भंगार वाहने उचलली असून यातील दोन सरकारी वाहने असल्याची माहीती मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स यांनी दिली.

(Mormugao Municipality has removed the abandoned vehicles)

वास्को शहरात बेवारसपणे रस्त्यावर पार्क केलेल्या भंगार वाहनांवर मुरगाव नगरपालिकेने कारवाई केली आहे. ही कारवाई केलेली सर्व भंगार वाहने सडा येथील कचरा प्रकल्पात टाकून दिली आहेत. ती वास्को शहरातील रस्त्यावर बेवारसपणे अनेक भंगार वाहने पार्क करून ठेवली होती.

कारवाई केलेली बहुतेक वाहने दहा वर्षा पेक्षा जास्त एकाच ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आली होती. अखेर वास्को वाहतुक पोलिसांनी पुढाकार घेऊन भंगार वाहनांची तपासणी करून सर्व माहिती मुरगाव नगरपालिकेला पाठविण्यात आली. पालिकेने गुरुवार(दि.10) पासून भंगार वाहनांवर कारवाई करण्यात सुरुवात केली.

शनिवारी मुरगाव नगरपालिकेने वास्कोतील भंगार वाहनावर कारवाई सुरुच ठेवली होती. यात वास्को सहाय्यक वाहतुक संचालकांच्या कार्यालयासमोरील सासष्टी तालुक्यातील गटविकास अधिकारी कार्यालयाची जीप, मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाचे वाहन टोल करून काढण्यात आली. तसेच वास्कोत आणखीन बेवारस भंगार सरकारी वाहनावर सुद्धा पुढील सप्तातहात देखील कारवाई करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT