वास्को: मुरगाव पालिका क्षेत्रातील घरमालकांनो, तुम्ही तुमचे घर, तुमचा फ्लॅट आणि बंगला भाड्याने दिला असेल,तर त्यासंबंधी पंधरा दिवसांमध्ये मुरगाव पालिकेला भाडेपट्टी करारपत्रासह संपूर्ण माहिती द्या. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देणारी नोटिस मुरगाव पालिकेने काढली आहे. विविध हाऊसिंग को-ऑप सोसायट्यांनी याप्रकरणी दखल घेऊन माहिती द्यावी, अशी आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित घरमालक सदर तपशील देण्यास अयशस्वी ठरल्यास, त्यांच्या संबंधित घर, फ्लॅट्स, बंगले वगैरेंची वीज, पाणी संबंधीचे ना हरकत दाखल मागे घेण्याची कारवाई होऊ शकते. रहिवासी सोसायट्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये एखाद्याने फ्लॅट भाड्याने दिला असल्यास त्यासंबंधी माहिती मुरगाव पालिकेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
एखाद्याने आपले घर, आपला फ्लॅट, बंगला भाड्याने दिल्यास, संबंधित मालकाच्या घरपट्टीमध्ये वाढ होते. तथापि सदर माहिती उघड होत नसल्याने मुरगाव पालिकेला महसुलाला मुकावे लागते. जर घर, फ्लॅट, बंगला मालक आपल्या मालमत्तेचा वापर स्वतःसाठी करीत असल्यास त्याला कमी घरपट्टी भरावी लागते.
त्यामुळे संबंधित घरमालक आपल्या भाडेकरूंची माहिती मुरगाव पालिकेला देत नाही. जर माहिती दिली तर त्या संबंधित घरमालकाला अंदाजे एका महिन्याचे भाडे मुरगाव पालिकेला भाडेपट्टीच्या रूपाने द्यावे लागणार आहे. मुरगाव पालिकेने सदर नोटीस काढून आपला महसूल वाढ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, सदर नोटीस संबंधित मालक किती गंभीरपणे घेतात, ते पुढील काही दिवसांत कळेल.
एका व्यक्तीला आधी चार हजारांच्या आसपास घरपट्टी होती. तथापि त्या जागेत इमारत बांधल्यावर त्या इमारतीत त्या व्यक्तीला दुकान दिले गेले. ते दुकान त्या व्यक्तीने एका मोठ्या व्यावसायिक कंपनीला दरमहा सुमारे दीड लाख रुपये भाडेपट्टीवर दिले. यासंबंधी मुरगाव पालिकेला माहिती मिळताच त्याला भाडेपट्टी कराराची प्रत देण्यास सांगितले. संपूर्ण माहिती मिळाल्यावर वार्षिक भाडेपट्टी सुमारे दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. तथापि याप्रकरणी दुर्लक्ष झाल्यावर नोटिसा पाठविण्यात आल्या. परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्या दुकानाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. परंतु त्या इशाऱ्याकडेही दुर्लक्ष झाल्याने, शेवटी त्या दुकानाला टाळे ठोकण्यात आले. आता त्या व्यक्तीने सदर भाडेपट्टीची रक्कम भरण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.