Mormugao Municipal Council: काहीच दिवसात राज्यभरात पावसाळ्याला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर गोव्यात मॉन्सूनपूर्व कामे सुरू आहेत. याच संदर्भात, मुरगाव नगरपरिषद (MMC) ने एक सार्वजनिक सूचना जारी करून पूर आणि भूस्खलन-प्रवण क्षेत्रामध्ये असलेल्या घरांतील रहिवाशांना शक्य तितक्या लवकर घरे रिकामी करण्यास सांगितले आहे.
नगरपरिषदेचे अध्यक्ष लिओ रॉड्रिग्स म्हणाले की, मुरगाव नगरपरिषद दरवर्षी धोक्याच्या क्षेत्रात असलेल्या घरांना नोटीस जारी करते. याआधी जेटी, रुमदावाडा आणि तारीवाडा येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे अनेक इमारतींना आणि घरांना फटका बसला होता.
प्रत्येक घरापर्यंत पोहोचू न शकल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही यावर्षी जाहीर सूचना देत आहोत. यावेळी, आम्ही नाले, नदी आणि तलावाजवळ राहणाऱ्यांना देखील नोटिसा बजावल्या आहेत कारण पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बोगदा येथील कठड्यावर असलेल्या घरांशिवाय जेटी, रुमदावाडा, तारीवाडा आणि हेडलँड-सडा या परिसरात राहणाऱ्यांना नोटिस जारी करण्यात आली आहे.
दरवर्षी नोटिसा बजावल्या जात असल्या तरी कोणीही घरे सोडत नाही. हे लक्षात घेता, नगरपरिषदेने सांगितले आहे की, जे नोटीसीकडे लक्ष देत नाहीत त्यांनी काही आपत्ती आपल्यास नगरपरिषदेला जबाबदार धरू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.