Shri Damodar Saptah Utsav  Dainik Gomantak
गोवा

दामबाबा मुरगाव पालिकेला पावले! सात दिवसांच्या सप्ताहात मिळवला एक कोटींचा महसूल

Vasco Damodar Saptah: दामोदर सप्ताहाच्या निमित्ताने फेरीचे आयोजन केले जाते, या फेरीच्या माध्यमातून पालिकेने मोठा महसूल कमवला आहे.

Pramod Yadav

वास्को येथील श्री दामोदर भजनी सप्ताहात मुरगाव पालिकेला विक्रमी महसूल मिळाला आहे. सात दिवसांच्या सप्ताहात पालिकेला एक कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. दामोदर सप्ताह काळात फेरीचे आयोजन केले जाते. यात हजारो भाविक भेट देत असतात. सप्ताहाच्या निमित्ताने राज्यातील लाखो भाविक दामबाबांच्या चरणी लीन होत असतात.

वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाला गेल्या आठवड्यात १० ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. सप्ताह उत्सव केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांच्या हस्ते श्री दामोदर देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर सप्ताहास सुरुवात झाली.

दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहास कोरोनाच्या काळात काही बंधने घालण्यात आली होती. त्यानंतर यावर्षीचा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारोंच्या संख्येने दरवर्षी भाविक या भजनी सप्ताहास भेट देत असतात.

यावर्षी देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी या सप्ताहास भेट दिली. तसेच, राज्यभरातील भाविकांनी सप्ताहास भेट देऊन आशिर्वाद घेतले.

दरम्यान, दामोदर सप्ताहामुळे मुरगाव पालिकेचा चांगला फायदा झाल्याचे दिसून येते. पालिकेला या सप्ताहात एक कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्यावर्षी हाच महसूल ९७ लाख रुपये होता, अशी माहिती नगराध्यक्ष गिरीष बोरकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT