Daji Salkar Dainik Gomantak
गोवा

Goa: जाहिरात फलक, खांबांवरील केबल त्वरित काढा- दाजी साळकर

Goa: मुरगावचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी दखल घेण्याची सूचना आमदार दाजी साळकर यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Goa: वाहनचालक व त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना अडचणीचे ठरणारे शहर भागातील जाहिरात फलक, खांबांवरील केबल त्वरित काढण्यासाठी आपण मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले आहे. तसेच याप्रकरणी मुरगावचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी दखल घेण्याची सूचना वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी केली.

येथील आयओसी चौकातील वाहतूक बेटावर लावण्यात आलेल्या जाहिरात फलकामुळे दोन दुचाकीचालक जखमी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी हे फलक व लोखंडी फ्रेम्स त्वरित हटविण्यात यावेत. ते हटविले गेले नाही तर निषेध उपोषण करणार असे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी त्या वाहतूक बेटावरच ठाण मांडले.

आमदार साळकर यांनी पोळजी यांच्याशी बोलणी केली. पोळजी यांनी शहर भागातील वीज खांबांवर लावलेला जाहिरात फलक फाटल्याने तेथे उरलेल्या लोखंडी फ्रेम्स रस्त्यावर पडलेल्या आहेत त्या दुचाकीचालकांसाठी कशा धोकादायक आहेत याची माहिती दिली.

दाजी साळकर, आमदार, वास्को-

केबल हटविण्यासंबंधी आपण उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले असून त्यासंबंधी कार्यवाही सुरू झाली आहे. नागरिकांना तसेच दुचाकीचालकांना धोकादायक ठरणारे फलक मुरगाव पालिकेने त्वरित हटवावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT