Morle water purification project Dainik Gomantak
गोवा

Morle: पर्येवासीयांना मिळणार हक्काचे पाणी! मोर्लेतील जल शुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात; 5 गावे होणार टँकरमुक्त

Morle water purification project: पर्ये मतदारसंघातील पाच प्रमुख पंचायत क्षेत्रांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी मोर्ले येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभा राहात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पिसुर्ले: पर्ये मतदारसंघातील पाच प्रमुख पंचायत क्षेत्रांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी मोर्ले येथे सुमारे १५ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प उभा राहात आहे. त्यामुळे येथील लोकांना पाण्यासाठी आणखी काही दिवस कळ सोसावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत या पंचायत क्षेत्रातील नागरिकांची तहान भागणार आहे.

पर्ये मतदारसंघात आठ पंचायतींचा समावेश आहे. यात केरी, मोर्ले, पर्ये, होंडा, पिसुर्ले, भिरोंडा, म्हाऊस, ठाणे, डोंगुर्ली यांचा समावेश आहे. पैकी वाळपई येथील दाबोस व साखळी पडोसे येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली आहे.

परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे आणि या दोन्ही प्रकल्पांतून पाणी मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने, या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या सहकार्याने मोर्ले येथे जलस्रोत खात्याच्या जमिनीवर जल शुद्धीकरण प्रकल्प उभा राहात आहे.

या प्रकल्पाचे काम जलस्रोत व ‘साबांखा’च्या वतीने करण्यात येत आहे. त्यामधील जलस्रोत खात्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर साबांखाचे काम सध्या जोरात सुरू आहे.अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी सुमारे १५ एमएलडी जल शुद्धीकरण प्रकल्प उभा राहात आहे. पर्ये येथील वाळवंटी नदीपात्रातील पाणी या प्रकल्पात आणून त्याचे शुद्धीकरण करून पुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून पाणीपुरवठा होणार असल्याने दाबोस प्रकल्पातून उपलब्ध होणारे पाणी इतर भागातील नागरिकांना मुबलक प्रमाणात मिळणार आहे.

यावेळी जलवाहिन्या घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले, की येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व भागांत जलवाहिन्यांचे काम पूर्ण होणार आहे.

पाच गावे होणार टँकरमुक्त

मोर्ले येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून पाच पंचायत क्षेत्रांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाण्याची समस्या सुटणार आहे. सालेली येथेही या प्रकल्पांतर्गत आणखी एक पाण्याची टाकी उभी करण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात पाचही पंचायत क्षेत्रे टँकरमुक्त होणार असल्याचा विश्वास आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT