Water Shortage in Valpoi: उन्हाळ्याची सुरूवातच अपुऱ्या पाणीपुरवठ्याने; वाळपईत नागरिक त्रस्त, कारण कय?

Water Shortage News: पाणी प्रक्रिया अधिकारी व पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने वाळपईतील भागाला गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाहीये
Valpoi water crisis
Valpoi water crisisDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी हा भाग बऱ्यापैकी हिरवागार आणि वनराईने नटलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या या भागात असलेल्या पाणी टंचाईमुळे स्थानिक त्रस्त आहेत.वाळपई या भागाला दाबोस पाणी पूरवठा प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो.पण आता सध्या दाबोस प्रकल्पाच्या यंत्रणेचे काम हाती घेतले आहे मात्र पाणी प्रक्रिया अधिकारी व पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने वाळपईतील भागाला गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाहीये.

वाळपईत पाणी पुरवठ्याची कमतरता असल्याने स्थानिक रोष व्यक्त करत आहेत. पाणी प्रक्रिया अधिकारी व पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी यांच्यात योग्य संवाद होत नसल्याने वाळपईमध्ये पाण्याची कमतरता असल्याची माहिती समोर आली आहे.

Valpoi water crisis
Water Shortage In Taleigao: वाढत्या बांधकामांमुळे ताळगावात पाणी समस्या! स्थानिकांचा आक्रोश; आमदार अन् अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

गेल्या आठवड्यापासून वाळपई येथे सुरु असलेल्या पाण्याच्या यंत्रणेच्या कामामुळे स्थानिकांना म्हणावा तसा पाणी पुरवठा होत नाही आणि परिणामी त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय.

पाणी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाळपईमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही मात्र पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पाच्या यंत्रणेची कामं सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाळपईमधील दाबोस येथे जुने पापं काढून नवीन आणि जास्ती क्षमतेचे पापं बसवण्याचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरु आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या गुरुवारपर्यंत ही समस्य सुटण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com