मोर्ले-बागवाडा पूल Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा मुक्तिपासून रखडलेला मोर्ले-बागवाडा पूल लवकरच मार्गी लागणार

13 कोटींचा खर्च : श्रावण महिन्‍यातच होणार पायाभरणी; आमदारांच्‍या प्रयत्‍नांना यश

Shreya Dewalkar

Goa News: गोवा मुक्तिपासून मोर्ले-बागवाडा या अरुंद पुलामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता येथील लोकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. कारण पर्येच्‍या आमदार दिव्‍या राणे तसेच आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या प्रयत्नामुळे या पुलाच्‍या कामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. सुमारे 13 कोटी रुपये खर्चून या पुलाचे काम करण्यात येणार आहे. त्‍यामुळे लोकांनी समाधान व्‍यक्त केले आहे.

मोर्ले-बागवाडा या पुलाची उभारणी वीस वर्षांपूर्वी वाळवंटी नदीवर करण्‍यात आली. त्यावेळची गरज म्हणून सदर पूल अरुंद स्वरूपाचा बांधण्यात आला होता. या पुलावरून एकच दुचाकी वाहन नेणे शक्य होते. लोक या पुलावरून

चालत जात. मात्र सध्‍या या पुलाची अवस्था पूर्णपणे बिकट झालेली आहे. पुलाच्या खालील भाग कमकुवत झाला असून लोखंडी सळ्या बाहेर आल्‍या आहेत.

या पुलाच्या जागी नवीन रुंद पूल उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. तीन वेळा या पुलाची फाईल पास होऊनही मंजुरी मिळाली नव्हती. मात्र गेल्या वर्षभराच्या कालखंडात आमदार डॉ. दिव्या राणे व आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या प्रयत्नामुळे हे काम आता मार्गी लागणार आहे.

त्यामुळे अनेक वर्षांपासूनची लोकांची मागणी आता पूर्ण असून त्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच आमदार दिव्‍या राणे यांचे आभार मानले आहेत.

सात किलोमीटर अंतर होणार कमी

मोर्ले-बागवाडा पूल कोणत्‍याही क्षणी कोसळण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. पूल अरुंद असल्याने एकावेळी एकच दुचाकी वाहन त्‍यावरून जाऊ शकते. पावसाळ्यात बागवाड्यावर जाणाऱ्यासाठी सुमारे सात किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यामुळे नवीन व रुंद पुलाची मागणी गेल्‍या अनेक वर्षांपासून होत आहे. आता नवीन पूल झाला तर अवघ्या अर्धा किलोमीटर अंतराने दोन्‍ही वाडे जोडले जातील. त्‍यामुळे वेळही वाचेल. चालू श्रावण महिन्यातच या पुलाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या पुलाचा फायदा सुमारे तीन हजार नागरिकांना होणार असून केरी, घोटेली नं. २, धनगरवाडा व इतर गावांबरोबरच दोन पंचायत क्षेत्रांचे अंतर कमी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राज्यात 'Three Kings Feast'ची धूम! कासावली, चांदोर, रेइस मागोसमध्ये भक्तीचा उत्साह

VIDEO: एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या छिद्रात अडकला चोरटा; घरमालकानं पोलिस बोलवल्यानंतर रंगलं रेस्क्यु ऑपरेशन Watch

Arjun Tendulkar: 4 सामन्यांत 0 विकेट! अर्जुन तेंडुलकरमुळे वाढले गोव्याचे टेन्शन; महागडी गोलंदाजी ठरतेय डोकेदुखी

Sonal: सफर गोव्याची! कडेकडेने वाहणारी नदी, शेते-भाते; सोन्यासारखा गाव 'सोनाळ'

Lakhere Bicholim: 100 वर्षांपूर्वीच्या गोठ्यावर टांगती तलवार! कोमुनिदाद जागेत असल्याचा दावा; डिचोली पालिकेची नोटीस जारी

SCROLL FOR NEXT