मोरजी ते पणजी कदंबा बससेवा सुरु
मोरजी ते पणजी कदंबा बससेवा सुरु Dainik Gomantak
गोवा

मोरजी ते पणजी कदंबा बससेवा सुरु

दैनिक गोमन्तक

मोरजी: जनहितासाठी सरकार (Goa Government) आपला आर्थिक फायदाही न पाहता जनसेवेसाठी कदंबा बस सेवा (Kadamba bus service) आज पर्यंत कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकांच्या मागणीनुसार मोरजी ते पणजी अशी कदंबा बससेवा सुरु केली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी 12 रोजी टेंबवाडा मोरजी येथे मोरजी ते पणजी अशी कदंबा प्रवासी सेवेचे उद्घाटन केल्यानंतर केले. (Morjim to Panajim Kadamba bus service started)

यावेळी मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर, पंच पवन मोरजे, पंच मुकेश गडेकर, पंच सुप्रिया पोके, माजी सरपंच मंदार पोके, दिनकर हलणकर, माजी सरपंच धनंजय शेटगावकर आदी उपस्थित होते.

आमदार दयानंद सोपटे यांनी पुढे बोलताना भाजपा सरकार सदोदित सर्वसामान्य नागरिकांचे हित पाहत आहे. कोरोना काळात अनेक प्रवासी बसेस बंद असल्याने नियमित काम धंदा निमित्ताने बाहेरगावी तालुक्याबाहेर जातात त्याना नियमित बसेस नसल्याने त्यांची बरीच धांदल होते. लोकांची गैरसोय लक्षात घेवून हि सेवा सुरु केल्याचे त्यांनी सांगितले."

मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर यांनी बोलताना नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून आमदार दयानंद सोपटे यांनी बससेवा सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आमदार दयानंद सोपटे यांच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. विकासाची दारे उघडण्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत चालू असल्याने व नागरिकांच्या समस्या कश्या सोडवाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असतो असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT