Morjim Tembwada Turtle Nesting Canva
गोवा

Morjim: मोरजीतील कासव मोहीम 'व्यावसायिकांसाठी' गुंडाळण्याचा प्रयत्न? पिल्लांची माहिती लपवली; वनमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Morjim Tembwada Turtle Nesting: टेंबवाडा किनारी गेल्या २५ वर्षांपासून वन खात्यातर्फे सागरी कासव संवर्धन मोहीम राबवली जाते.

Sameer Panditrao

मोरजी: टेंबवाडा येथील समुद्रकिनारी गेल्या डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत एकूण १०६ सागरी कासवांनी किमान साडेदहा हजार अंडी घातल्याची तसेच यापैकी तीन सागरी कासवांच्या अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले समुद्रात सोडल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली.

परंतु येथे असलेल्या अभ्यास केंद्राकडून ही माहिती लपविली जात असल्याने येथील कासव संवर्धन मोहिमेबाबत संशय व्यक्त आहे. येथील पर्यटन व्यावसायिकांना किनारा मोकळा करून देण्यासाठी कासव संवर्धन मोहीम गुंडाळण्याचा हा डाव असल्याचा लोकांना संशय आहे.

टेंबवाडा किनारी गेल्या २५ वर्षांपासून वन खात्यातर्फे सागरी कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. सागरी कासवांसाठी हा किनारा आरक्षित करण्यात आला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात सागरी कासव येथे अंडी देण्यासाठी येतात.

वन विभाग या कासवांवर नजर ठेवून अंड्यांना सुरक्षा प्रदान करते. त्यासाठी येथे कासव संवर्धन केंद्र उभारलेले आहे. अंड्यांतून पिल्ले बाहेर आल्यानंतर सुरक्षितपणे समुद्रात सोडून दिली जातात. गेली २४ वर्षे ही मोहीम यशस्वीपणे राबवली गेली आहे. येथे असलेल्या कासव संवर्धन केंद्र याबाबत वेळोवेळी माहिती प्रकाशित करत आले आहे. परंतु यंदा या केंद्राकडून कोणतीच माहिती जाहीर केली जात नाही, त्यामुळे या मोहिमेबाबत लोक संशय घेऊ लागले आहेत. येथील कासव संवर्धन मोहीम गुंडाळण्यासाठी तर ही माहिती लपविली जात नसेल ना, असा लोकांना संशय आहे.

कासव संवर्धन मोहिमेमुळे येथील पर्यटनावर अनेक निबंध आले आहेत. किनाऱ्यावर प्रखर विद्युत झोत, कर्णकर्कश संगीत आदींवर निर्बंध आहेत. हरित लवादाने याबाबत सक्त निर्देश दिले आहेत. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना हा किनारा मोकळा करून देण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. माहिती लपविण्यामागे हाच दबाव कारण आहे, असा लोकांचा संशय आहे.

वनमंत्र्यांनी लक्ष घालावे

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी या मोहिमेसंदर्भात जातीने लक्ष घालणे आवश्‍यक आहे. येथील अभ्यास केंद्रातून माहिती उपलब्ध का होत नाही, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. कुणाच्या दबावाखाली माहिती लपविली जाते, तसेच यात नक्की कुणाचा हात आहे याची चौकशी करावी, अशी मागणी येथील व्यावसायिक संजय कोले यांनी केली आहे.

टेंबवाडा किनारा सागरी कासवांसाठी आरक्षित आहे, त्यामुळे या ठिकाणी यंदा किती कासवे आली, किती अंडी घातली तसेच किती पिल्ले समुद्रात याबाबत माहिती लोकांना कळणे आवश्‍यक आहे. ही माहिती लपवण्यामागे प्रयोजन काय?
पवन मोरजे, सरपंच मोरजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT