Agonda: आगोंदमध्‍ये कासवाची 50 पिल्ले धावली किनाऱ्याकडे; वन खात्‍याला स्‍थानिकांचे सहकार्य

Sea Turtles At Agonda: आगोंद सागरी कासव संवर्धन केंद्रातून या मोसमात पहिल्या घरट्यातून ५० पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. गुरुवारी पहाटे घरट्यातून ही पिल्ले बाहेर आली.
Sea Turtles In Goa
Sea Turtles At AgondaDainik Gomantak
Published on
Updated on

Agonda Goa Sea Turtles

काणकोण: आगोंद सागरी कासव संवर्धन केंद्रातून या मोसमात पहिल्या घरट्यातून ५० पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. आज गुरुवारी पहाटे घरट्यातून ही पिल्ले बाहेर आली. या घरट्यात ६५ अंडी होती. उर्वरित अंड्यांतून पिल्ले बाहेर येणे बाकी आहे, असे वन खात्याच्या दक्षिण गोवा सागरी क्षेत्राचे उपक्षेत्रीय अधिकारी राजेश नाईक यांनी सांगितले.

आगोंद समुद्रकिनाऱ्यावर आत्तापर्यंत ८५ सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी ८५४३ तर गालजीबाग किनाऱ्यावर २२ सागरी कासवांचे आगमन त्यांनी २३६१ अंडी घातली आहेत. त्‍यामुळे काणकोणातील या दोन्ही किनाऱ्यांवर १०७ सागरी कासवांच्या घरट्यांत १०,९०४ अंडी आहेत.

कासवाच्‍या घरट्यातून पिल्ले बाहेर पडण्यासाठी सुमारे ४५ ते ५० दिवसांचा कालावधी लागतो. आता गालजीबाग व आगोंद किनाऱ्यावर सागरी कासवांच्या संवर्धनासाठी स्‍थानिकांचेही चांगले सहकार्य लाभत असल्याचे वनाधिकारी नाईक यांनी सांगितले.

Sea Turtles In Goa
Olive Ridley: किनाऱ्यावर पर्यटकांच्या पार्ट्यांमुळे, गाड्यांमुळे कासवे परत गेली? वागातोरला 'टर्टल नेस्टिंग साईट'ची गरज

गतसाली ७१०६ अंडी झाली खराब

सागरी कासवांच्‍या अंड्यांचे संरक्षणासाठी आगोंद‌ किंवा गालजीबाग किनाऱ्यावर स्‍थलांतर करण्यात येते. गेल्या वर्षी तेथील सागरी कासव संवर्धन केंद्रात सर्वाधिक २३१ सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी २२,१८३ अंडी घातली. त्यापैकी १३,२५३ अंड्यांतून पिल्ले बाहेर आली. तसेच ७१०६ अंडी खराब झाली. ११७० पिल्ले समुद्रात सोडण्यापूर्वीच मरण पावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com