Morjim  Dainik Gomatnak
गोवा

Morjim: सावधान! गोव्यातील 'या' रस्त्यावर गाडी लावल्यास होणार कारवाई; स्थानिकांना पार्किंग सोय करणे बंधनकारक

Morjim Road Parking: खिंड मोरजी ते न्यू वाडा या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण सध्या सुरू आहे. या कामामध्ये दोन्ही बाजूंना गटार व्यवस्था, संरक्षणभिंती आणि इतर पूरक सुविधा उभारल्या जात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील मुख्य आणि समुद्रकिनारी भागाला जोडणाऱ्या रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांवर आता पंचायत प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच विलास मोरजे यांनी दिली.

खिंड मोरजी ते न्यू वाडा या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण सध्या सुरू आहे. या कामामध्ये दोन्ही बाजूंना गटार व्यवस्था, संरक्षणभिंती आणि इतर पूरक सुविधा उभारल्या जात आहेत. मात्र, रस्ता आधीच अरुंद असल्याने आणि स्थानिक व्यावसायिक तसेच हॉटेल मालकांकडून वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय न केल्याने येथे येणारे अनेकजण रस्त्यावरच वाहने पार्क करत आहेत.

यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. या संदर्भात सरपंच मोरजे म्हणाले, नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर वाहतूक विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अरुंद रस्त्यांवर पार्किंग करून अडथळे निर्माण करू नयेत, अशी नागरिकांना सूचना देण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, स्थानिकांनी बांधकाम सुरू करण्यापूर्वीच पार्किंगची सोय निश्चित करणे आवश्‍यक आहे.

दरम्यान, पंचायतीने ज्या ठिकाणी वारंवार बेशिस्त पार्किंग होते, त्या ठिकाणी कायमस्वरूपी “नो पार्किंग झोन” घोषित करून तसा ठराव संमत करून उपजिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा. पंचायतने काही ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले असले तरी अनेक वाहनचालक नियम धाब्यावर बसवून तासन्तास वाहने उभी ठेवतात. अशा वाहनांवर ट्रॅफिक पोलिसांनी तत्काळ दंडात्मक कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.

आरोलकरांचे आवाहन

यासंदर्भात मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की, सध्या रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यानंतर सर्व रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येईल. रस्त्यालगत असलेल्या दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांनी स्वतःच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करावी. रस्त्यावर पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे टाळावे, असे आवाहन आमदार आरोलकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mandovi Pollution: मळा तलाव प्रदूषणानंतर आता मांडवी नदी न्यायालयाच्या रडारवर; कॅसिनो आणण्यापूर्वी कोर्टाची परवानगी अनिवार्य

Bison Attack: फोंड्यात रानगव्याचा थरार! बेतोडा जंक्शनजवळ होमगार्डवर जीवघेणा हल्ला; 48 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये 'ऑल इज नॉट वेल'? हार्दिक RCBविरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर; सूर्याकडेच राहणार कमान

Horoscope: बाप्पाची कृपा आणि नशिबाची साथ! आज 'या' राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, घरात येईल पैसाच पैसा

Social Media: सोशल मीडिया म्हणजे माकडांच्या हाती लागलेली कोलीत? ट्रोलरांच्या वानरी डीएनएला शुद्धीकरणाची गरज

SCROLL FOR NEXT