Blue Taxi counter Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: 'ब्ल्यू कॅब'ला पहिले काउंटर द्या, टॅक्सीवाल्यांची मागणी; काउंटर 15 वर भाडी मिळत नसल्याची तक्रार

Blue Taxi counter Mopa Airport: काउंटर १५ क्रमांकावर सुरू करण्यात आल्याने पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने या टॅक्सी व्यावसायिकांनी पुन्हा आपल्या काही मागण्या पुढे रेटल्या आहेत.

Sameer Amunekar

मोरजी: मोपा विमानतळावर तीन महिने बंद ब्लू कॅब टॅक्सी काउंटर सरकारने वाहतूक खात्याअंतर्गत सुरू केला असला तरी हा काउंटर १५ क्रमांकावर सुरू करण्यात आल्याने पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने या टॅक्सी व्यावसायिकांनी पुन्हा आपल्या काही मागण्या पुढे रेटल्या आहेत.

१५ क्रमांकावर सुरू करण्यात आलेला काउंटर पहिल्या क्रमांकावर द्यावा, पार्किंगसाठी सोयिस्कर जागा द्यावी आदी मागण्या या व्यावसायिकांनी केल्या आहेत. सरकारने चतुर्थीपूर्वी या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे.

यावेळी टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे सरचिटणीस महेश देसाई, अध्यक्ष संजय कांबळी व इतर टॅक्सी व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्या समस्या मांडताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मोपा विमानतळावर ब्लू कॅप टॅक्सी काउंटर १५ क्रमांकावर दिलेला आहे. त्या ठिकाणी प्रवासी मिळवताना खूप अडचणी येतात.

दिवसाला केवळ चार-पाच भाडी मिळतात, त्यामुळे या टॅक्सी व्यवसायिकांना मिळत असल्यामुळे सरकारने आम्हाला प्राधान्य क्रमाने प्रथम क्रमांकाचा काउंटर द्यावा. अशी जोरदार मागणी केली. असा त्यांचा दावा आहे.

या काउंटरवर एकूण २०० टॅक्सी व्यावसायिकांना सरकारने परमीट दिले होते. त्यातील आता केवळ १७० परमीटधारक व्यवसाय करतात, असे यावेळी सांगण्यात आले.

...भूमिपुत्रांना न्याय द्या : यावेळी टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्या समस्या मांडत असताना मोपा विमानतळासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आपली जागा दिली आहे, त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र टॅक्सी व्यावसायिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: 'सत्य काय आहे, ते जनतेसमोर यावे'! काणकोणकर आरोप प्रकरणावरुन सरदेसाईंची मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; रामा काणकोणकरचा नवा ‘ट्वीस्ट’

Goa BJP: 'त्‍यांना सरकार, भाजपचे नाव बदनाम करायचे होते हे दिसून येते', काणकोणकरांच्या आरोपांवरती तानावडेंचे प्रत्त्युत्तर

Goa Police: पोलिसांची राज्यभर नाकाबंदी मोहीम, 2972 वाहनांची तपासणी; 35 जण प्रतिबंधात्मक अटकेत

Mapusa Theft: 6 दिवस उलटले, मुख्य दरोडेखोर मोकाटच; म्हापसा चोरीप्रकरणी पोलिस पथके दक्षिणेकडे रवाना

SCROLL FOR NEXT