Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

...म्हणून मुरगाव नगरपालिका घेणार 3 कोटींचे कर्ज

नगरपालिकेने बँकेकडून (Bank) कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

मुरगाव: मुरगाव नगरपालिकेने (MMC) कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देण्यासाठी 3 कोटी रुपये कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेने कर्जासाठी अर्ज केला आहे. कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे पगार थकीत आहेत.

पगार न मिळाल्यास संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. याबाबत बोलताना MMC चेअरपर्सन दामोदर कासकर म्हणाले, नगरपालिकेने डिसेंबरचा पगार त्या महिन्याच्या 23 तारखेला ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने दिला होता. जानेवारी महिन्याचा पगार फेब्रुवारीमध्ये दिला जाईल. कमी उत्पन्नामुळे MMC ची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. महसूल संकलनासाठी जबाबदार असलेले अधिकारी निवडणूक (Election) ड्युटीवर असल्याने MMC ला निधीच्या तुटवड्याचा सामना करावा लागला आहे. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही उपाय योजना केल्या जात आहेत.

ते पुढे म्हणाले, नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांचे थकीत पगार भरण्यासाठी नगरपालिकेने बँकेकडून (Bank) कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी महापालिका प्रशासन संचालनालयाकडे (डीएमए) पाठवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT